कणकवलीत कोरोनाचे तीन रूग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवलीत कोरोनाचे तीन रूग्ण
कणकवलीत कोरोनाचे तीन रूग्ण

कणकवलीत कोरोनाचे तीन रूग्ण

sakal_logo
By

कणकवलीत कोरोनाचे तीन रूग्ण

लसीकरण मोहीम; नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ४ ः तीन वर्षांपासून असलेले कोरोनाचे सावट अजूनही दूर झालेले नाही. तालुक्यात अजूनही ३ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत ८५ हजार ४३८ नागरिकांचा लसीचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. तसेच ६ हजार ४३० रुग्णांनी बूस्टर डोस घेतला आहे.
कणकवलीत सध्या कोरोना बाधित तीन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या महामारीनंतर देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली. यामध्ये प्राधान्याने हेल्थ वर्करचे लसीकरणाला प्राधान्य दिले आहे. यामध्ये तालुक्यात हेल्थ वर्करला पहिला डोस १७१६, दुसरा डोस १४११ नागरिकांनी घेतला असून ६८५ नागरिकांना बूस्टर दिला आहे. फ्रंटलाईन वर्कर मधील ११८७ जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर ६७० जणांनी दुसरा डोस घेतला आहे. यात २६१ जणांना बुस्टर डोस दिला आहे. नागरिकांच्या १८ ते ४४ वयोगटात ४० हजार ६३ जणांना पहिला डोस पूर्ण झाला असून ३७ हजार ४२७ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तर ९४३ जणांना बूस्टर डोस देण्यात आला आहे. तसेच ४५ ते ६० वयोगटांमध्ये २८ हजार १७२ जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर २५ हजार ५०१ जणांनी दुसरा डोस घेतला असून या गटांमध्ये ८८४ जणांचा बुस्टर देण्यात झाला आहे. याचबरोबर ज्येष्ठ नागरिक साठ वर्षांवरील पहिला डोस २२ हजार ४७१ तर दुसरा डोस २० हजार ४२९ जणांनी घेतला असून ३६८४ जणांना बुस्टर दिला आहे. तालुक्यात आतापर्यंत पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ९३ हजार ६०९ असून दुसरा डोस पूर्ण झालेले नागरिक ८५ हजार ४३८ इतके आहेत. तर आत्तापर्यंत ६४३० जणांना बूस्टर लसीकरण झाले आहे. तालुक्यात आतापर्यंत एक लाख ८५ हजार ४७७ जणांनी लसीकरण केले असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपजिल्हा रूग्णालयात सध्या लसीकरण सुरू असल्याचे सांगण्यात आले.
-----
कोट
कोरोनाचे संकट अजूनही दूर झालेले नाही. नियम शिथिल केले असले तरी यासाठी प्रत्येक रुग्णांनी, प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या गणेशोत्सव सुरू असून मोठ्या प्रमाणात गर्दीची ठिकाणे वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी.
- डॉ. संजय पोळ, वैद्यकिय अधिकारी, कणकवली
------
एक नजर
* तीन रूग्णांवर उपचार सुरू
* ८५ हजार ४३८ नागरिकांचे लसीकरण
* ६ हजार ४३० रुग्णांना बुस्टर

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93383 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..