चिपळूण - 226 कोटीच्या 2 पाणी योजना तांत्रिक मंजुरीच्या प्रक्रियेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण -  226 कोटीच्या 2 पाणी योजना तांत्रिक मंजुरीच्या प्रक्रियेत
चिपळूण - 226 कोटीच्या 2 पाणी योजना तांत्रिक मंजुरीच्या प्रक्रियेत

चिपळूण - 226 कोटीच्या 2 पाणी योजना तांत्रिक मंजुरीच्या प्रक्रियेत

sakal_logo
By

दोन पाणी योजनांना तांत्रिक मंजुरी
चिपळूण शहर, ग्रामीण भागासाठी २२६ कोटींचा खर्च ; खेड तालुक्यातील गावाचाही समावेश
चिपळूण, ता. ४ : चिपळूण व खेड तालुक्यातील २७ गावांना कोळकेवाडी धरणाच्या आऊटलेटमधून ग्रॅव्हीटीने पाणी देण्याची योजने तांत्रिक मंजुरीपर्यंत आली आहे. कोळकेवाडी धरणातूनच चिपळूण शहराला ग्रॅव्हिटीने पाणी पुरवठा करण्यासाठी तयार केलेली स्वतंत्र योजनाही तांत्रिक मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. शहराची १२० कोटी आणि २७ गावांची १०६ कोटीची म्हणजेच २२६ कोटीच्या पाणी योजना आता मंजुरीच्या अंतिम प्रक्रियेत आल्या आहेत.
कोयना धरणातील पाणी वीजनिर्मितीसाठी वापरल्यानंतर ते वाशिष्ठी नदीत सोडले जाते. हे पाणी परिसरातील कित्येक गावांची तहान भागवू शकते व ही गावे कायमस्वरूपी टंचाईमुक्त होऊ शकतात. या दृष्टिकोनातून आमदार भास्कर जाधव आणि शेखर निकम हे गेल्या काही वर्षांपासून सतत पाठपुरावा करीत आहेत.
आमदार निकम यांनी चिपळूण तालुक्यातील गावांना कोळकेवाडी धरणातून पाणी देण्याची संकल्पना मांडली. त्यात जाधव यांनी खेड तालुक्यातील गावांचा समावेश केला. पुणे येथील मॉडर्न सर्व्हे कन्सलटंसी या कंपनीची नेमणूक करण्यात आली. या एजन्सीने सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले आहे. त्यानूसार २४ ग्रामपंचायतींमधील २७ गावांना ग्रॅव्हीटीने धरणाच्या आऊटलेटमधून पाणी देणे शक्य आहे. या २७ पैकी १५ गावांतील सर्व वाड्यांना, तर १२ गावांतील काही वाड्यांना पाणी देता येऊ शकेल, असे स्पष्ट केले आहे. या सर्व गावांची पाहणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, उपविभाग चिपळूण यांनी केली. त्याबाबतचा अहवाल २१ मे २०२१ ला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मुख्य अभियंता यांना सादर केला. त्यानंतर योजनेचे १०६ कोटीचे अंदाजपत्रक तयार करून ते तांत्रिक मान्यतेसाठी पाठवण्यात आले आहे. केवळ दोन वर्षात २७ गावांना पाणी पुरवठा करण्याची योजना फास्टट्रकवर आली आहे. चिपळूण शहराला कोळकेवाडी धरणातून ग्रॅव्हिटीने पाणी पुरवठा करण्याची संकल्पना चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांनी २००४ मध्ये मांडली होती. पालिकेने ही योजना हाती घेतली खरी, परंतू कासव गतीने योजनेचा प्रवास सुरू आहे. अनेक निवडणुकीत ही योजना प्रचाराचा मुद्दा ठरली. १८ वर्षाच्या प्रदीर्घ प्रवासानंतर आता ही योजना तांत्रिक मान्यतेपर्यंत पोहचली आहे.

कोट
कोळकेवाडी धरणातून ग्रॅव्हिटीने चिपळूण व खेड तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा करणे शक्य आहे. ही योजना मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे. जनहिताची कामे मी कोणत्याही पक्षाच्या सरकारकडून मंजूर करून घेणार.
---भास्कर जाधव, आमदार, गुहागर

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93384 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..