चिपळूण - 90 टक्के गणेश मूर्तींचे होणार नदीत विसर्जन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण - 90 टक्के गणेश मूर्तींचे होणार नदीत विसर्जन
चिपळूण - 90 टक्के गणेश मूर्तींचे होणार नदीत विसर्जन

चिपळूण - 90 टक्के गणेश मूर्तींचे होणार नदीत विसर्जन

sakal_logo
By

नदीत ९० टक्के गणेश मूर्तींचे विसर्जन

चिपळूण तालुका ; निर्माल्य गोळा करण्याची व्यवस्था

चिपळूण, ता. ४ ः पाच दिवसाच्या लाडक्या बाप्पाचे सोमवारी (ता. ५) विसर्जन केले जाणार आहे. चिपळूणसह अलोरे - शिरगाव आणि सावर्डे पोलिस ठाण्याच्या हद्दीत गणेश विसर्जनाची तयारी करण्यात आली आहे. चिपळूण पालिकेने गणेश विसर्जनासाठी दोन ठिकाणी कृत्रिम तलावाची व्यवस्था केली आहे. मात्र मूर्ती विसर्जनासाठी गणेश भक्त कृत्रिम तलावाऐवजी वाशिष्ठी नदीला प्राधान्य देत आहेत. ९० टक्के मूर्तींचे विसर्जन वाशिष्ठी नदीत करण्यात येणार आहे. उर्वरित विसर्जन नैसर्गिक आणि कृत्रित तलावात होणार आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर पोलिस आणि होमगार्डचा बंदोबस्त असणार आहे. शहरातील एकेरी मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. शहर आणि परिसरातील २१ विसर्जन घाट व त्या घाटाकडे जाणाऱ्या पाखाड्या चकाचक करण्यात आल्या आहेत. विसर्जनाच्या ठिकाणी निर्माल्य गोळा करण्याची व्यवस्थाही केली आहे . बाप्पांवर पेठमापसह अन्य विसर्जन घाटांवर फुलांचा वर्षाव केला जाणार आहे. विसर्जनाच्या ठिकाणी ११ पथके तयार करण्यात आली आहेत.


येथे होणार गणेश मूर्तींचे विसर्जन
शहरात पागमळा सावंत घरामसोर, पाग लेनवाडी शिंदेमळा मारुती मंदिर, पाग दगडीपूल कलमांची बाग, विरेश्वर कॉलनी घोड विहीर, बहादूरशेख नाका पाणी उदकसिंचन केंद्र, डांगेघर बहादूरशेख वडार कॉलनी, शंकरवाडी, मुरापूर भोईवाडी, मुरादपूर गांधारेश्वर मंदीर, पेठमाप बाजारपूल विसर्जन घाट, पेठमाप भाटण, गोवळकोट नदी, गोवळकोट धक्का, स्मशानभूमी, रामतीर्थ तलाव आदी.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93386 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..