रत्नागिरी-रत्नागिरीत मँगो, मरीन आणि कॅश्यू पार्क उभारु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-रत्नागिरीत मँगो, मरीन आणि कॅश्यू पार्क उभारु
रत्नागिरी-रत्नागिरीत मँगो, मरीन आणि कॅश्यू पार्क उभारु

रत्नागिरी-रत्नागिरीत मँगो, मरीन आणि कॅश्यू पार्क उभारु

sakal_logo
By

उदय सामंत अर्धा कॉलम फोटोPNE21R46843


रत्नागिरीत आंबा, मासळी, काजू पार्क उभारु
उदय सामंत ; निर्यातीसाठी मोठ्या बंदरांचा उपयोग करणार
रत्नागिरी, ता. ४ ः कोकणातील आंबा, काजू, मासळी जेएनपीटी ऐवजी जयगडे येथील बंदरातून परदेशात पाठवण्यासाठी रत्नागिरीत लॉजीस्टीक पार्कच्या बरोबरीने मँगो पार्क, मरीन पार्क आणि कॅश्यू पार्क उभारण्यासाठी उद्योग खात्याने तत्वतः मान्यता दिली आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथील रत्नागिरीचा राजा मंडळाच्या मंडपामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राहूल पंडित, बिपिन बंदरकर, राजन शेट्ये, निमेश नायर, दीपक पवार, अभिजित गोडबोले आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, ‘केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये राज्यातील अन्य पाच जिल्ह्यांबरोबर रत्नागिरीत लॉजीस्टिक व कंटेनर पार्क उभारण्यास मान्यता मिळाली आहे. त्याला आवश्यक जागा एमआयडीसीमध्ये उपलब्ध करून दिली जाईल. त्यासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळणार आहे. रत्नागिरी तालुक्यात जयगड येथे जिंदल, आंग्रे पोर्टसह तिन मोठी बंदरे एकाच परिसरात आहेत. त्यांचा उपयोग करुन आंबा, काजू, मासळी परदेशात पाठविणे शक्य आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील उसाची मळीही जयगडमधील या बंदरातून पाठविली जाते. या सर्वांसाठी आवश्यक जागा जयगड परिसरात उपलब्ध करुन दिली जाईल. त्याचबरोबर वाटद-खंडाळा येथील शेतकऱ्यांशी चर्चा करून कातळावरील पडीक जमिनीचा उपयोग करून प्रदुषणविरहीत कारखाना आणण्याचा विचार आहे; परंतु जागा निवडताना लोकवस्ती, मंदिरे, मशिद किंवा अन्य कोणतीही वास्तू तिथे नसेल याची खात्री केली जाईल. उद्यमनगर (रत्नागिरी) येथील स्टरलाईटच्या जागेसंदर्भात अनिल अगरवाल यांच्याशी चर्चा सुरू आहे. हा प्रश्‍न न्यायालयीनस्तरावर आहे. तेथे कोणताही उद्योग आणला जाऊ शकतो. कोकणातील मुलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी काम सुरू असून लोटे, देवरूख, रत्नागिरीतील आजारी उद्योगांना बँकांचे अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. त्याचा अहवाल मागवला आहे. उद्योगांचा विस्तार आणि नवीन येऊ घातलेले उद्योग याबाबत लवकरच निर्णय घेतले जाणार आहेत. लांजा, राजापूर येथे मिनी एमआयडीसी सुरू करण्याचाही विचार आहे.

चौकट
८५० जणांना कौशल्य प्रशिक्षण
महाविकास आघाडीच्या कालावधीत नवीन उद्योजक घडविण्यासाठी ६३ कोटींची तरतूद केली होती. त्यामधून २५०० लोकांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार होते; मात्र शिंदे-फडणवीस सरकारने प्रोत्साहनपर निधीत वाढ करुन तो ५५० कोटी रुपये केला आहे. यामधून राज्यातील २५ हजार तरुणांना प्रशिक्षण दिले जाईल. यामधून ७५ हजार नवीन रोजगार निर्माण होणार आहे. या योजनेसाठी रत्नागिरी जिल्ह्याला ८५० चे लक्ष्य आहे. गणेशोत्सवानंतर ते लक्ष डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93387 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..