रत्नागिरी- क्राईम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- क्राईम
रत्नागिरी- क्राईम

रत्नागिरी- क्राईम

sakal_logo
By

किरकोळ कारणारवरून
मारहाण, १५ जणांविरुद्ध गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ ः विचारणा केल्याच्या रागातून शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात १५ जणांविरुद्ध परस्पर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २) दुपारी साडेतीनच्या सुमारास कोकणनगर मशिदीजवळ घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तवसूर आसिफ वाडकर (वय ३९, रा. कोकणनगर, मशिदीजवळ, रत्नागिरी) यांचे पती जेवण करुन कामावर गेल्यावर तवसुर या शबाना हिच्या घरी गेल्या व त्यांचा मेहुणा त्यांच्या घराकडे सारखा बघत असल्याबाबत विचारणा केली. त्यावेळी संशयित शबाना नाजिम फणसकर, सबा नजिम फणसकर, नबिल नाजिम फणसकर (तिन्ही रा. कोकणनगर), शबाना यांचा मेहुणा (नाव, गाव माहित नाही), शबाना हिच्या मेहुण्याची दोन मुले, सिराज वाडकर, नसरिन वाडकर (पूर्ण नाव नाही, रा. कोकणनगर,मशिदीजवळ) यांनी तवसुर वाडकर यांना व त्यांच्या मुलाला मारहाण केली. या प्रकरणी तवसुर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. फिर्यादी शबाना नाजिम फणसकर (वय ४५, रा. कोकणनगर, मशिदीजवळ-रत्नागिरी) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संशयित तवसूर आसिफ वाडकर, जासिम आसिफ वाडकर (दोन्ही रा. कोकणनगर), रईस (पूर्ण नाव नाही), सुफियान गुहागरकर, धनू (पूर्ण नाव नाही), सलमान अलगी आणि अन्य एक यांनी शिवीगाळ करून काठीने व लोखंडी पाईपने शबाना फणसकर यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात परस्पर विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत. तक्रारीवरुन पोलिसांनी १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.

जे. के. फाईल्स येथील
वृद्धाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी ः . सुभाषचंद्र दत्तात्रय कोचरेकर (वय ७६, रा. पांडुरंग सोसायटी, जे. के. फाईल्स -रत्नागिरी) यांचा झापेतच मृत्यू झाला. शहर पोलिस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी (ता. ३) घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोचरेकर यांच्या पत्नी अपर्णा सुभाषचंद्र कोचरेकर या सकाळी त्यांना उठविण्यासाठी गेल्या असता त्यांची हालचाल होत नव्हती, म्हणून १०८ रुग्णवाहिकेला बोलावले. त्यातील डॉक्टरांनी त्यांची नाडी काम करत नसल्याचे सांगितले. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपास मृत घोषित केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93388 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..