रत्नागिरी-गणपतीपुळेत बुडणार्‍या मिरजेतील दोघांना वाचवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-गणपतीपुळेत बुडणार्‍या मिरजेतील दोघांना वाचवले
रत्नागिरी-गणपतीपुळेत बुडणार्‍या मिरजेतील दोघांना वाचवले

रत्नागिरी-गणपतीपुळेत बुडणार्‍या मिरजेतील दोघांना वाचवले

sakal_logo
By

पर्यटकांना काढले बाहेर

रत्नागिरी, ता. ४ ः गणपतीपुळे येथील समुद्रात रेड झोन भागात पोहायला गेलेल्या दोघा पर्यटकांना किनाऱ्‍यावरील जीवरक्षकांनी बाहेर काढले. हा प्रकार आज दुपारी साडेतीनच्या सुमारास घडला. हे पर्यटक मिरज येथील होते. हे दोघेही खोल पाण्यात वाहून जाण्याची शक्यता होती. जीवरक्षकांच्या प्रसंगावधानामुळे अनुचित प्रकार टळला.
पाच दिवसांपूर्वी गणपतीपुळे येथील समुद्रात विशिष्ट ठिकाणी पाण्याच्या प्रवाहामुळे निर्माण होत असलेल्या खड्ड्यात (चाळ) अडकून एक पर्यटक बुडणार होता; पण किनाऱ्‍यावरील सागररक्षकांनी त्याला बाहेर काढले. पावसाळी वातावरणामुळे अजूनही समुद्र खवळलेला असून, पाण्याला करंट आहे. पोलिस प्रशासनाने पोहणाऱ्‍यांसाठी ‘रेड झोन’ जाहीर केला आहे; मात्र जीवरक्षकांकडून वारंवार सूचना देऊनही याच धोकादायक ठिकाणी पर्यटक पोहायला गेले होते. हे दोघेही मिरज (जि. सांगली) येथील आहेत. ही बाब किनाऱ्‍यावरील लोकांच्या लक्षात आल्यावर किनाऱ्‍यावरील जीवरक्षकांनी पाण्यात जाऊन त्या दोघांनाही बाहेर काढले. दोघांनाही सूचना देऊन जीवरक्षकांनी माघारी पाठविले. पुन्हा त्याच ठिकाणी आणखी आठ पर्यटक पोहण्यासाठी गेले होते. त्यातील दोन जण खोल पाण्यात जाण्याची शक्यता होती; मात्र जीवरक्षकांनी त्यांनाही वेळीच बाहेर काढले. या प्रकारांनंतर प्रशासनाकडून पर्यटकांना खोल समुद्रात धोकादायक ठिकाणी पोहण्यास जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93397 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..