मालवणात जेटस्की जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालवणात जेटस्की जप्त
मालवणात जेटस्की जप्त

मालवणात जेटस्की जप्त

sakal_logo
By

L47856-
मालवण ः बंदर विभागाने रविवारी येथील एका व्यावसायिकाची जेटस्की जप्त केली.

47857
मालवण ः दांडी भागात सुरू असलेले विना परवाना वॉटर स्पोर्टस्‌ रविवारी बंदर विभागाच्या पथकाने बंद पाडले.

मालवणात जेटस्की जप्त
तीन वॉटर स्पोर्टस्‌ व्यावसायिकांनाही दंड

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ४ ः बंदर विभागाने धडक येथील समुद्रात विनापरवाना वॉटर स्पोर्टस् सुरू करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई केली. बंदर जेटी येथील एका व्यावसायिकाची जेटस्की जप्त केली. शनिवारपासून मिळून तीन व्यावसायिकांकडून सुमारे २४ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला. ही माहिती बंदर अधिकारी रजनीकांत पाटील यांनी आज दिली.
या वर्षीच्या पर्यटन हंगामास सुरुवात झाली आहे. येथील जलक्रीडा प्रकारांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकही दाखल होऊ लागले आहेत. पर्यटन हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात तारकर्ली येथील समुद्रात बोट उलटून काही पर्यटकांना आपला प्राण गमवावा लागला. या घटनेमुळे येथील पर्यटनाला गालबोट लागले. त्यामुळे अशा घटना घडू नयेत, यासाठी शासनाने कडक भूमिका स्वीकारली आहे.
येथील जलक्रीडा प्रकारांचा आनंद लुटण्यास पर्यटक दांडी, बंदर जेटी परिसरात दाखल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर बंदर विभागाने केलेल्या तपासणी मोहिमेत काल (ता.३) दांडी येथील एका व्यावसायिकाकडून १० हजार रुपयांचा तर बंदर जेटी परिसरात दोन व्यावसायिकांकडून तीन हजार २०० व एक हजार २०० असा चार हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला. बंदर जेटी येथील समुद्रात आज विना परवाना जलक्रीडा प्रकरणी राज्य साहसी पर्यटन उपक्रम धोरणाच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार एका व्यावसायिकाची जेटस्की जप्त केली. शिवाय दहा हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. दांडी भागात विना परवाना सुरू असलेले वॉटर स्पोर्टस्‌ बंद करण्यात आले. बंदर निरीक्षक रजनीकांत पाटील, साहेबराव कदम, विजय तोरसकर कर्मचारी सहभागी झाले होते. सर्व व्यावसायिकांनी नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. पर्यटकांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. या दृष्टिकोनातून किनारपट्टी भागात बंदर विभागातर्फे तपासणी तसेच कारवाईची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती बंदर निरीक्षक पाटील यांनी यावेळी दिली.

उद्या बैठक
जलक्रीडा व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या समस्यांसंदर्भात बंदर विभागातर्फे मंगळवारी (ता. ६) सकाळी अकराला येथे नगर वाचन मंदिर सभागृहात बैठक आहे. प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन संदीप भुजबळ, बंदर निरीक्षक रजनीकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. समस्यांचे निराकरण आणि आवश्यक मार्गदर्शन केले जाणार आहे. तालुक्यातील जलक्रीडा व्यावसायिकांनी बैठकीत उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93398 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..