पाच दिवसांच्या गणरायांना निरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाच दिवसांच्या गणरायांना निरोप
पाच दिवसांच्या गणरायांना निरोप

पाच दिवसांच्या गणरायांना निरोप

sakal_logo
By

४७८९२
मिठमुंबरी : येथे रविवारी पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाले. (छायाचित्र : वैभव केळकर)

पाच दिवसांच्या गणरायांना निरोप
सिंधुदुर्गात उत्साह ः चाकरमानीही परतीच्या प्रवासाला
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ४ ः गेले पाच दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर जिल्ह्यातील अनेक भाविकांनी आज गणरायांना निरोप दिला. उद्या (ता.५) अनेक घरातून गौरींसह गणरायांना निरोप दिला जाणार आहे. आज मोठ्या संख्येने गणेशमूर्ती विसर्जनासाठी येणार असल्‍याने जिल्ह्यातील सर्व नदीकाठचे गणपती साणे सज्‍ज ठेवण्यात आले होते. अनेक भाविकांनी गणरायांना निरोप देताना ‘पुढच्या वर्षी लवकर’ असा जयघोष केला. पाऊस नसल्‍याने जल्‍लोषात आणि मिरवणुका काढून वाजत गाजत गणरायांना निरोप देण्यात आला. दरम्यान, अनेक चाकरमान्यांनी उद्या (ता. ५) कामावर हजर होण्यासाठी परतीची वाट धरली होती.
यंदा चतुर्थीनंतर चौथ्या दिवशी गौरींचे वाजत गाजत आगमन झाले. त्यानंतर गौर सजविण्यात आली. महिलांच्या फुगड्या रात्री उशिरापर्यंत रंगल्‍या होत्या. आज पूजनानंतर गौरींसह गणरायांना पंचपक्वानांचा नैवैद्य दाखविण्यात आला. खारेपाटण, वरवडे, कणकवली शहर तसेच अनेक गावांतील प्रथापरपंरानुसार गौरींना मटणाचा नैवेद्य दाखविण्यात आला. त्‍यासाठी मित्रमंडळी, नातेवाईक यांना आग्रहाची निमंत्रणेही देण्यात आली होती.
सायंकाळी चार‍यानंतर वाजत गाजत गणेशमूर्ती नदीकाठी, तळी तसेच कृत्रिम तळ्याच्या काठावर आणण्यात आल्‍या. या वेळी महिला वर्गाचीही मोठी उपस्थिती होती. कणकवली शहरात जानवली आणि गडनदी काठच्या गणपती साणा येथे सायंकाळी उशिरापर्यंत मूर्ती विसर्जन सोहळा सुरू होता. कनकनगर, मराठा मंडळ येथील गणपती साण्यांवरही विसर्जनासाठी मूर्ती आणण्यात आल्या होत्या.
गणरायांची मनोभावे सेवा केल्‍यांनतर आज नियमित रेल्‍वे गाड्यांसह गणेशोत्‍सव विशेष रेल्‍वे गाड्यामधून चाकरमानी मुंबईला रवाना झाले. चाकरमान्यांनी रेल्‍वे स्थानकात गर्दी केली होती. दोन वर्षानंतर प्रथमच सर्व रेल्‍वे गाडयांचे जनरल डब्‍याचे बुकिंग सुरू झाल्‍याने चाकरमान्यांना दिलासा मिळाला. शहरातील खासगी वाहन तळावरही चाकरमान्यांनी मुंबईला जाण्यासाठी गर्दी केली होती. उद्या (ता.५) गौरींसह गणरायांना निरोप दिला जाणार आहे. हा सोहळा दणक्‍यात होण्यासाठी अनेक ढोल पथके सज्‍ज झाली आहेत. खारेपाटण तसेच अनेक शहरांमध्ये मिरवणूक काढून गणेशमूर्ती विसर्जन सोहळा होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93430 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..