बंद पडलेल्या एसटीतील बॅटरी चोरली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बंद पडलेल्या एसटीतील बॅटरी चोरली
बंद पडलेल्या एसटीतील बॅटरी चोरली

बंद पडलेल्या एसटीतील बॅटरी चोरली

sakal_logo
By

बंद पडलेल्या एसटीतील बॅटरी चोरली
रत्नागिरी ः शहरातील टीआरपी येथील पुलाजवळ बंद पडलेल्या एसटी महामंडळाच्या बसची बॅक्समधील 3 हजाराची बॅटरी चोरट्याने पळविली. शहर पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी ते शनिवारी (ता. 3) रात्री साडेबाराच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी (ता. 2) चालक दत्तप्रसाद पाडाळकर यांनी एसटी (एमएच-20-बीएल-0749) ही इंजिन गरम होऊन बंद पडली. म्हणून टीआरपी रेल्वे पुलाजवळ लावण्यात आली होती. शुक्रवारी-शनिवारी या कालावधीत गाडीच्या डाव्या बाजूस असलेली बॅटरीच्या बॉक्समधील 3 हजार रुपयांची लिव्ह गार्ड कंपनीची बॅटरी चोरट्याने पळविली. या प्रकरणी प्रमोद इन्मानुएल शिंदे (वय 55, रा. पोलिस मुख्यालय शेजारी, मिशन कॅम्प, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93433 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..