बेळगाव : मराठी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेळगाव : मराठी
बेळगाव : मराठी

बेळगाव : मराठी

sakal_logo
By

KOP22L47832
KOP22L47833

सीमाभागातील जनमानसात रुजलेल्या ‘सकाळ’ची गौरवपूर्ण दखल
---
नववीच्या ‘अध्ययन पूर्णप्राप्ती’ पुस्तकात ‘सकाळ’बाबत संवाद
सकाळ वृत्तसेवा
बेळगाव, ता. ५ : गेल्या काही वर्षांपासून सीमाभागातील मराठी भाषिक वाचकांच्या मनात अढळ स्थान मिळविलेल्या ‘सकाळ’ची दखल शिक्षण खात्याने घेतली आहे. बेळगाव जिल्ह्यातील मराठी शाळांमध्ये सर्वाधिक ‘सकाळ’ वर्तमानपत्र वाचले जाते. त्याची दखल घेऊन ‘सकाळ’बाबत इयत्ता नववीच्या कलिका चेतरिके (अध्ययन पूर्णप्राप्ती) या पुस्तकात ‘सकाळ’बाबत प्रश्न विचारण्यात आला आहे. सीमाभागातील जनमानसात ‘सकाळ’ खोलवर रुजल्याचेच यातून प्रतिबिंबित होते.
कोरोनामुळे गेली दोन वर्षे शाळा बंद होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाल्याने आणि विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेत घसरण झाल्याचे दिसून आल्यावर शिक्षण खात्याने २०२२-२३ चे शैक्षणिक वर्ष अध्ययन पूर्णप्राप्ती वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्यानुसार मागील दोन वर्षांतील अभ्यासक्रमांची उजळणी व्हावी, यासाठी शिक्षण खात्याने ‘अध्ययन पूर्णप्राप्ती’ हे पुस्तक विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले.
इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या पुस्तकात अध्ययन कृती क्रमांक पाचमध्ये ‘आमचे संभाषण’ या विषयावर आजोबा व त्यांच्या नातीतील संवाद आहे. यात नातीने आजोबांना, ‘आजोबा, नेट सुरू केलंय. कोणते वर्तमानपत्र वाचायचे आहे, तुम्हाला?’ असा प्रश्न विचारला आहे. या वेळी उत्तर देताना आजोबा ‘सकाळ’ असे उत्तर देतात. तसेच, वर्तमानपत्र संगणकावर वाचल्यावर वर्तमानपत्रातील सर्व पाने व्यवस्थितरीत्या वाचता येतात, अशी माहितीही आजोबा देतात.
यंदा पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अध्ययन पूर्णप्राप्ती वर्षानिमित्त शिक्षकांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्याचे कामही सुरू आहे. त्यामुळे गेली दोन वर्षे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून निघण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जातो.

चौकट
विविध विषयांवर ‘सकाळ’कडून नेहमीच पुढाकार
सीमाभागातील मराठी भाषिकांच्या विविध विषयांवर आवाज उठविण्याबरोबरच शिक्षण क्षेत्रातील नवनवीन घडामोडी आणि आवश्यक माहिती देण्यात ‘सकाळ’ने नेहमीच पुढाकार घेतला. तसेच, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याचे काम काही वर्षांपासून ‘सकाळ’तर्फे सुरू आहे. त्यामुळेच वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या ‘सकाळ’ची दखल शिक्षण खात्यानेही घेतली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93466 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..