गृहनिर्माण संस्थांना शासनाचा दिलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गृहनिर्माण संस्थांना शासनाचा दिलासा
गृहनिर्माण संस्थांना शासनाचा दिलासा

गृहनिर्माण संस्थांना शासनाचा दिलासा

sakal_logo
By

गृहनिर्माण संस्थांना
शासनाचा दिलासा
मालवणः गृहनिर्माण संस्थेने सक्षम प्राधिकाऱ्यांची परवानगी न घेता, अनधिकृतरित्या सदस्यत्व हस्तांतरण केले असेल, अशा प्रकरणी संबंधित गृहनिर्माण संस्थेस जबाबदार धरून या संस्थेस सदनिका धारण केलेल्या प्रथम वर्षाच्या वार्षिक दर विवरणपत्रातील दराच्या २.५ टक्के दंडनीय अधिमूल्य आकारावे व सक्षम प्राधिकारी सहकारी कायद्यातील तरतुदीनुसार संबंधित प्राधिकरणाकडे संस्थेविरुद्ध कारवाई प्रस्तावित करतील, असा शासन निर्णय यापूर्वी झाला होता. दरम्यान, शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आता शासन निर्णयातील व सक्षम प्राधिकारी सहकार कायद्यातील तरतुदीनुसार संबंधित प्राधिकरणाकडे संस्थेविरुद्ध कारवाई प्रस्तावित करतील हे वाक्य वगळले आहे. त्यामुळे संस्थांवरील कारवाईची टांगती तलवार बाजूला झाली असून दंडात्मक तरतुद कायम राहिली आहे. याबाबतचा शासन निर्णय महसूल व वन विभागाचे सहसचिव रमेश चव्हाण यांच्या सहीने प्रसिद्ध केला आहे.
-------------
पावसाअभावी
शेती संकटात
कुडाळः सिंधुदुर्गात शेती पिकण्याचा हंगाम तोंडावर अलेला असतानाच वरुणराजाने अचानक दांडी मारली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या आठ दिवसांत एखादी पावसाची सर येते, त्यानंतर कडकडीत ऊन पडते. त्यामुळे शेतकरी बांधव चिंतेत आहे. काही शेती डोंगर, खडकाळ भागात असल्यामुळे शेतकर्‍यांना पाण्याचे साधनही उपलब्ध होत नाही. भात, नाचणी, भुईमूग, कुळीथ यासारखी पिके शेतकरी शेतात पिकवतात. ती सध्या पिकण्याच्या तोंडावर आली आहेत; परंतु पाऊस पडत नसल्यामुळे पिके सुकून गेली आहेत. काही ठिकाणी तुरळक पाऊस पडतोय. शेतीला पूरक प्रमाणात पाऊस पडणे आवश्यक आहे.
---------------
वेंगुर्लेतून
जादा गाड्या
वेंगुर्लेः गणेशोत्सवासाठी वेंगुर्ले तालुक्यात दाखल झालेल्या मुंबई व पुणे चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी वेंगुर्ले आगार सज्ज झाले आहे. आगारप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव हंगामाचे नियोजन करण्यात आले असून ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीत वेंगुर्ले आगारातून जादा आरोंदा, बोरिवली, विरार-मुंबई व पुणे मार्गावर १३ गाड्यांचे बुकींग प्रवाशांकडून केले आहे. यावर्षी प्रवाशी वर्गाकडून एस.टी.च्या प्रवासाला पसंती लाभत असल्याचे दिसून येत आहे. प्रवाशांच्या परतीच्या प्रवासासाठी नियोजन केले आहे. प्रवाशांची मागणी आल्यास आणखी जादा गाड्या सोडण्यात येणार आहे. प्रवाशी ग्रुपने मुंबई व पुणे येथे जाण्यासाठी ११ सप्टेंबरपर्यंत बुकिंगची सुविधा एस. टी. महामंडळामार्फत ठेवली आहे, अशी माहिती स्थानकप्रमुख नीलेश वारंग यांनी दिली.
-------------------
कार्यकर्त्यांचा
निरवडेत गौरव
सावंतवाडीः निरवडे ग्रामविकास उल्लेखनीय प्रक्रियेत कार्य करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी निरवडे सरपंच हरी वारंग, पंचायत समिती माजी सदस्य नारायण राणे, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, उपसरपंच चंद्रकांत गावडे, ग्रामविकास अधिकारी तृप्ती राणे, माजी सरपंच सदा गावडे, निवृत्त ग्रामविकास अधिकारी मधुकर घाडी, ग्रामपंचायत सदस्य पांढरे, अर्जुन पेडणेकर, शिल्पा सावळ, सुविधा गावडे, सुप्रिया निरवडेकर, संजय गावडे, गावडे, तलाठी नमिता कुडतरकर, सुनील गावडे, विलास गावडे, संजय शेटकर, मुक्ता मेस्त्री उपस्थित होते. सूत्रसंचालन ओमप्रकाश तिवरेकर यांनी केले.
................

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93540 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..