आंजिवडे घाटमार्गासाठी प्रयत्नशील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंजिवडे घाटमार्गासाठी प्रयत्नशील
आंजिवडे घाटमार्गासाठी प्रयत्नशील

आंजिवडे घाटमार्गासाठी प्रयत्नशील

sakal_logo
By

swt57.jpg
47954
पाटगावः आंजिवडे घाटमार्गाचा प्रश्न सोडवा या मागणीचे निवेदन मंत्री दीपक केसरकर यांना देण्यात आले.

आंजिवडे घाटमार्गासाठी प्रयत्नशील
दीपक केसरकरः पाटगावमधील ग्रामस्थांना आश्वासन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ५ः आंजिवडे घाटमार्गासाठी माझे प्रयत्न असणार आहेत. निधीची कुठेही कमतरता येणार नाही. हा घाटमार्ग प्रश्न लवकरच मार्गी लावू, असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पाटगाव (जि. कोल्हापूर) येथील ग्रामस्थांना दिले.
मंत्री केसरकर हे पाटगाव येथे आले असता कोल्हापूर, सिंधुदुर्गला जोडणाऱ्या जवळचा असा आंजिवडे-पाटगाव घाटमार्गाचा प्रश्न लवकर सोडवा, अशी मागणी पाटगाव येथील ग्रामस्थांनी त्यांच्याकडे केली. याबाबतचे सह्यांचे निवेदनही त्यांना देण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी सरपंच विलास देसाई, नंदकुमार ठाकूर यांच्यासह अजिंक्य ग्रुप कला क्रिडा मंडळाने त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी भद्रकाली मंदिरात जाऊन दर्शन घेतले. सार्वजनिक गणपतीबरोबरच घरगुती गणपतीचेंही दर्शन घेतले.
आंजिवडे घाटमार्ग झाला तर पाटगावचा पर्यटनदृष्ट्या विकास होईल. पाटगाव व आंजिवडेपासून काही अंतरच घाटमार्ग आहे. हा अत्यंत कमी लांबीचा घाटमार्ग असल्याने शासनाला कमीत कमी खर्चात मार्ग करता येईल. शासनाचा निधीही कमी लागेल आणि महत्वाचे म्हणजे दोन्ही बाजूचा विकास होणार आहे, असे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले व तसे निवेदन दिले. यावर मंत्री केसरकर म्हणाले, "मी या घाटमार्गाबाबत सखोल माहिती घेत आहे. यापूर्वी या मार्गाच्या सर्व्हेसाठी निधी दिला आहे. तो सर्व्हे अहवाल आला असेल. त्यानंतर अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहाणी करूया. या घाटमार्गासाठी माझे प्रयत्न असणार आहेत. निधीची कुठेही कमतरता येणार नाही. हा घाटमार्ग प्रश्न मार्गी लावू. माझे आणि पाटगावचे जवळचे नाते असून भद्रकाली देवी आजोळची देवी आहे. त्या निमित्ताने इथे येणे-जाणे होत असते."
यावेळी सरपंच देसाई, उपसरपंच महेश पिळणकर, माजी सरपंच ठाकूर, संजय पिळणकर, संतोष पिळणकर, प्रमोद तेंडोलकर, प्रितम देसाई, वसंत देसाई, शरद पाळेकर, रमेश केसरकर, सचिन कोठावळे, यतिन पिळणकर, सुहास केसरकर, अमित वर्दम, सुजित पिळणकर, उत्तम पिळणकर, उमेश पिळणकर, विशाल देसाई, अभय पिळणकर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93546 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..