संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat५p६.jpg ःKOP२२L४७९७५ दापोली ः फलकामुळे दिसत नसलेली दिशादर्शक पाटी.
-------------------------

दिशादर्शक फलक शोभेचे
दाभोळ ः दापोली शहरात नगरपंचायतीच्या स्थापनेपासून प्रथमच नगरपंचायतीकडून दिशादर्शक फलक शहरात ठिकठिकाणी उभारण्यात आले आहेत; मात्र हे फलक शोभेचेच ठरत असून याबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. दापोली नगरपंचायतीच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच शहरामधील चौकांमध्ये मार्गदर्शक पाट्या लावण्यात आल्या आहेत. या पाट्या ज्या ठिकाणी लावण्यात आल्या त्या ठिकाणी शुभेच्छा फलकही अन्य काहीजणांनी लावलेले असल्याने या दिशादर्शक पाट्या दिसत नाहीत. त्यामुळे शहरात येणाऱ्या पर्यटकांना चौकशी करूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. शहरातील केळसकर नाका येथे लावण्यात आलेली दिशादर्शक पाटी दिसत नाही. त्या ठिकाणी असलेला शुभेच्छा फलक हटवण्यात यावा जेणेकरून नागरिकांची मार्गक्रमण करताना गैरसोय होणार नाही, अशी मागणी दापोलीकारांकडून करण्यात आली आहे.
---------
दापोलीतील ११ खेळाडूंचा क्रीडादिनी गौरव
दाभोळ ः राष्ट्रीय क्रीडादिन ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात झाला. राज्यातील विविध क्रीडाप्रकारात नैपुण्य मिळवलेले अनेक खेळाडू उपस्थित होते. या वेळी दापोलीच्या तब्बल ११ खेळाडूंवर कौतुकांचा वर्षाव करून मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा परिषद भारत यांच्यातर्फे सुवर्णलक्ष राष्ट्रीय क्रीडा खेलरत्न पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. यामध्ये वैष्णव शिंदे, स्नेहा भाटकर, सुहान बैकर, गार्गी केळकर, ऋषिकेश गुहागरकर, उत्कर्षा पाटील, शर्वरी शिगवण, सौम्या आंजर्लेकर, साईप्रसाद वराडकर, सुजन तरडे, नाविन्या सोनवाडकर यांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी कराटे, पिंचॅक सिलाट व लाठी या क्रीडाप्रकारात राष्ट्रीय व राज्य पातळीवरील स्पर्धांमध्ये सुवर्णपदके मिळवली आहेत. या सर्वांना सुरेंद्र शिंदे यांनी मार्गदशन केले आहे.
---------------------------

दापोली अर्बनमध्ये डाएटवर मार्गदर्शन

दाभोळ ः दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजमधील महिला विकास कक्ष विभागाच्यावतीने महाविद्यालयात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी तमन्ना शेख यांनी मुलींना हेल्दी इटींग व डाएट यावर मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक काही समस्या यांचेही निरसन करत पोषक आहार कसा व किती करावा यावर विद्यार्थिनींना माहिती दिली. कार्यक्रमासाठी प्राचार्य संदेश जगदाळे, डब्ल्युडीसी समन्वयक प्रियांका साळवी, प्रा. नंदा जगताप, प्रा. ज्योती दिंडे, प्रा. नेत्रांजली महाडिक, प्रा. नम्रता गांधी, प्रा. श्रद्धा खुपटे, प्रा. अमृता मोहिते उपस्थित होते.
-----------------

दापोलीमध्ये आविष्कार कार्यशाळा
दाभोळ ः मुंबई विद्यापीठ विद्यार्थी कल्याण विभाग आणि दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यातील महाविद्यालयासाठीची आविष्कार रिसर्च कन्वेन्शन २०२२-२०२३ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या शाळेमध्ये आविष्कार स्पर्धेचे मुंबई विद्यापीठ आविष्कार विशेष अधिकारी डॉ. मिनाक्षी गुरव, रत्नागिरी जिल्हा आविष्कार समन्वयक सुरेंद्र ठाकुरदेसाई आणि तसेच रोहा येथील डॉ. सी. डी. देशमुख महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. सम्राट जाधव हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. या कार्यशाळेत रत्नागिरी जिल्ह्यातील २० महाविद्यालयातील शिक्षक आणि बहुसंख्य विद्यार्थी प्रतिनिधी सहभागी झाले होते.
---------------------

सावर्डे बौद्धवाडीतील सावंतांना मदत द्या
चिपळूण ः तालुक्यातील सावर्डे बौद्धवाडी येथील नीलेश सावंत यांच्या घरावर भलेमोठे झाड कोसळून त्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे सावंत कुटुंबीयांना तातडीने शासकीय आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी नुकतीच तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील राजकीय पक्ष व संघटनांनी प्रशासनाकडे निवेदन देत केली आहे. या संदर्भात पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी चिपळूणचे नायब तहसीलदार तानाजी शेजाळ यांची भेट घेऊन निवेदन दिले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते राजूभाई जाधव, प्रशांत मोहिते, सुभाष जाधव, संदेश मोहिते, विनोद कदम, काशीराम कदम आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93564 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..