कणकवली : रिक्षाचालकाचा असाही प्रामाणिकपणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kankavli Rickshaw
रिक्षाचालकाचा असाही प्रामाणिकपणा

कणकवली : रिक्षाचालकाचा असाही प्रामाणिकपणा

कणकवली : रिक्षाने कणकवलीहून ओरोस येथे सोडलेल्या महिला प्रवाशाची बॅग रिक्षातच राहील्याचे रिक्षाचालक सिद्धू उर्फ सिद्धार्थ शिवराम कदम (वय ४०, रा.वरवडे ) यांच्या लक्षात आले. त्यांनी बॅग कणकवली पोलीसांकडे सुपूर्द केली. बॅगेत सापडलेल्या कागदपत्रानुसार पोलिसांनी महिलेशी संपर्क साधून बॅग तिच्याकडे सुपूर्द केली. सिद्धार्थ यांच्या प्रमाणिकपणाचे पोलिसांनीही कौतुक केले.

सिद्धार्थ हे येथील जुन्या पोस्टानजीक रिक्षा व्यवसाय करतात. रविवारी सकाळी दहाच्या सुमारास योगिता शंकर कांबळे (रा. ओरोस) या ओरोस येथे जाण्यासाठी सिद्धार्थ यांच्या रिक्षात बसल्या. ओरोसला पोहोचल्यानंतर त्या रिक्षातून उतरल्या व रिक्षाभाडे देऊन निघून गेल्या. पुढे कणकवलीत परतलेल्या सिद्धार्थ यांना योगिता यांची बॅग रिक्षातच राहील्याचे लक्षात आले. सिद्धार्थ यांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठले. पोलीस हवालदार मिलिंद देसाई यांनी तपासणी केली असता बॅगेत पैसे नसले तरी महत्वाची कागदपत्रे दिसून आली. त्याआधारे देसाई यांनी योगिता यांना बोलावून बॅग सुपूर्द केली. सिद्धार्थ यांच्या प्रामाणिकपणाने भारावलेल्या योगिता यांनी त्यांना बक्षिस देण्याचा प्रयत्न केला. मात्र, सिद्धार्थ यांनी ते नम्रपणे नाकारले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93619 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Sindhudurg