संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat५p८.jpg ः KOP२२L४७९८१ लांजा ः मंडळाच्यावतीने गोकर्ण हा देखावा सादर करण्यात आला आहे.
------------------------
भांबेडमधील गणेशोत्सवात गोकर्णचा देखावा
लांजा ः गेली ४१ वर्षे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या लांजा तालुक्यातील भांबेड येथील नवयुग उत्कर्ष युवक मंडळ भांबेड पेठदेव यांच्यावतीने यावर्षी गणेशोत्सवानिमित्त गोकर्ण अर्थात आत्मलिंगाची स्थापना हा देखावा सादर करण्यात आला आहे. हा देखावा भाविकांच्या विशेष पसंतीला उतरला आहे. या मंडळाच्यावतीने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचे यावर्षीचे हे ४२वे वर्ष आहे. या उत्सवानिमित्त दररोज विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण उत्सवासाठी मंडळाचे अध्यक्ष भालचंद्र लाड, राजेंद्र गांधी तसेच अन्य सर्व पदाधिकारी, सदस्य यासाठी मेहनत घेत आहेत.


केवायसी अपूर्ण असल्यास
किसान सन्मानचा लाभ नाही
लांजा ः प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना बारावा हप्तासाठी पात्र शेतकरी व खातेदारांना आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कालावधी वाढवला आहे. ७ सप्टेंबरपर्यंत आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन तहसीलदार प्रमोद कदम यांनी केले आहे. या योजनेचा बारावा हप्ता पात्र खातेदारांना वाटप करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने सर्व संबंधित खातेदारांनी आपली केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. ती पूर्ण झाल्याशिवाय सदर पात्र शेतकरी, खातेदार यांना शासनाकडून बारावा हप्ता वितरित करण्यात येणार नसल्याचे महसूल विभागाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93642 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..