रत्नागिरी- विस्तार अधिकारी मयुरी जोशी सेवानिवृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- विस्तार अधिकारी मयुरी जोशी सेवानिवृत्त
रत्नागिरी- विस्तार अधिकारी मयुरी जोशी सेवानिवृत्त

रत्नागिरी- विस्तार अधिकारी मयुरी जोशी सेवानिवृत्त

sakal_logo
By

rat५p२०.jpg-
४८०४४
संगमेश्वरः सेवानिवृत्तीनिमित्त विस्तार अधिकारी मयुरी जोशी यांचा सत्कार करताना गटशिक्षणाधिकारी प्रदीप पाटील. सोबत पद्मनाभ जोशी आणि कर्मचारी, अधिकारी.
------------------
विस्तार अधिकारी मयुरी जोशी सेवानिवृत्त
रत्नागिरी, ता. ५ ः संगमेश्वर पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी येथील प्रसिद्ध कलाकार मयुरी जोशी या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या. ३९ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर त्या निवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रदीप पाटील, सर्व विस्तार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जोशी यांना कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या. गेल्या वर्षभराच्या अल्प कालावधीमध्ये जोशी यांनी प्रशासकीय काम उत्तमरित्या पार पाडले, असे गौरवोद्गार गटशिक्षणाधिकारी पाटील यांनी काढले.
जोशी यांना देवरूख क्र. २ शाळा, सायले, निवे, परबवाडी, वाशीतर्फे देवरूख या चारही केंद्रांनी आपुलकीने शुभेच्छा दिल्या. जोशी यांनी उपशिक्षक, पदवीधर, शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी या पदांवर काम केले. उत्तम प्रशासक, मार्गदर्शक तसेच सर्व विद्यार्थ्यांना समजून घेणाऱ्या व सर्व सहकारी शिक्षक, कर्मचाऱ्यांना सांभाळून घेतले. कीर्तन, नाटक, वक्तृत्व व लेखनातही त्यांचे योगदान आहे. सत्काराला उत्तर देताना जोशी यांनी पंचायत समिती संगमेश्वरचे सर्व कर्मचारी, बीटमधील शिक्षक, माहेर, सासरची जोड या सर्वांमुळे एवढी सेवा शक्य झाल्याचे सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93644 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..