चाकरमान्यांसाठी वेंगुर्ले आगार सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चाकरमान्यांसाठी वेंगुर्ले आगार सज्ज
चाकरमान्यांसाठी वेंगुर्ले आगार सज्ज

चाकरमान्यांसाठी वेंगुर्ले आगार सज्ज

sakal_logo
By

चाकरमान्यांसाठी वेंगुर्ले आगार सज्ज
जादा बसेस ः ११ सप्टेंबरपर्यंत बुकींगची सुविधा
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ५ ः गणेशोत्सवासाठी तालुक्यात दाखल झालेल्या मुंबई व पुणे चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी वेंगुर्ले आगार सज्ज झाले आहे. आगारप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव हंगामाचे नियोजन करण्यात आले असून आगारातून जादा आरोंदा, बोरिवली, विरार-मुंबई व पुणे मार्गावर १३ गाड्यांचे बुकींग प्रवाशांकडून करण्यात आले आहे. मुंबई व पुणे येथे जाण्यासाठी ११ सप्टेंबरपर्यंत बुकींगची सुविधा एसटी महामंडळामार्फत ठेवण्यात आली असल्याची माहिती स्थानकप्रमुख निलेश वारंग यांनी दिली.
नियोजन असे ः उद्या (ता.६) दुपारी ३ वाजता आरोंदा-परळ, दुपारी ४ वाजता वेंगुर्ले-बोरिवली (या तिन्ही गाड्या कुडाळ-चिपळूण पनवेल-सायनमार्गे जातील), दुपारी ४ वाजता वेंगुर्ले-पुणे (तुळस, आंबोली, आजरामार्गे निगडी), सायंकाळी ५ वाजता वेंगुर्ले-पुणे (तुळस, आंबोली, आजरामार्गे विश्रांतवाडी-भोसरी-निगडी). ता. ७ ः वेंगुर्ले-विरार ही बस दुपारी ३ वाजता (कुडाळ, चिपळूण, पनवेल, ठाणे, वसईमार्गे जाणार आहे.), आरोंदा-परेल दुपारी ३ वाजता व वेंगुर्ले बोरिवली ही बस दुपारी ४ वाजता (कुडाळ-चिपळूण-पनवेल-सायनमार्गे जातील) या मार्गाने प्रवास करतील. वेंगुर्ले-पुणे (तुळस, आंबोली, आजरामार्गे निगडी) दुपारी ४ वाजता व सायंकाळी ५ वाजता (तुळस, आंबोली, आजरामार्गे विश्रांतवाडी-भोसरी-निगडी) असा प्रवास करतील. वेंगुर्ले आगाराने चाकरमान्यांच्या परतीसाठी केलेल्या या एसटी बस सेवेच्या जादा गाड्यांचा लाभ घ्यावा. जास्तीत जास्त चाकरमान्यांनी एसटी गाड्यांचे बुकींग करावे, असे आवाहन वेंगुर्ले आगार व्यवस्थापक व बसस्थानक प्रमुख निलेश वारंग यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93650 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..