पाच दिवसांच्या गणरायांना सातार्डात भक्तिमय निरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाच दिवसांच्या गणरायांना सातार्डात भक्तिमय निरोप
पाच दिवसांच्या गणरायांना सातार्डात भक्तिमय निरोप

पाच दिवसांच्या गणरायांना सातार्डात भक्तिमय निरोप

sakal_logo
By

swt५१८.jpg
४८०५३
सातार्डाः येथील बाजारपेठ मांडावर विसर्जनासाठी दाखल झालेल्या गणेशमूर्ती.

पाच दिवसांच्या गणरायांना
सातार्डात भक्तिमय निरोप
तेरेखोल खाडीपर्यंत विसर्जन मिरवणूक
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ५ ः तालुक्यातील सातार्डा गावामध्ये पाच दिवसीय गणपतींचे मोठ्या थाटात मध्यरात्रीपर्यंत विसर्जन करण्यात आले. सातार्डा गावामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही तरचावाडा बाजारपेठ येथील श्री देव महापुरुष मांडावर आलेल्या पाच दिवसांच्या सुमारे २५ हून अधिक गणेशमूर्तींचे रविवारी थाटात विसर्जन झाले. तरचावाडा बाजारपेठ भागातील बहुतांश गणेशमूर्तींचे विसर्जन तेरेखोल खाडीमध्ये केले जाते. तेरेखोल खाडी गोवा राज्याला जोडली असल्याने दोन्ही काठांवर विसर्जनाच्या फटाक्यांची आतषबाजी आणि गणेशभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.
"हे गणपती गजानना, गावकऱ्यांनी तुझी पाच दिवस केली आहे, ती सेवा मान्य करून घे. गाव गोकुळासारखा नांदव. गावात असलेल्या बाळगोपाळांना नोकरीधंद्यामध्ये यश दे, शिक्षणामध्ये बुद्धी दे आणि सगळ्यांना सुखी राख. आयुष्य, आरोग्य देऊन भले कर" अशा प्रकारचे गाऱ्हाणे दरवर्षीप्रमाणे मकरंद मांजरेकर यांनी मांडावर घातले आणि ''गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर'' च्या गजरामध्ये बाजारपेठेतून तेरेखोलखाडी तरीपर्यंत गणेश विसर्जनाची मिरवणूक काढण्यात आली. यावर्षीही गणेश विसर्जन मांडावर भजनाचा मान केरकरवाडी युवक मंडळाला मिळाला. त्यांनी सादर केलेल्या ''आंब्या तुझो टाळ टाळ, मोडूनी रथ सजविला'' या गजरासह गवळणीने सर्वांचीच पावले थिरकली. त्यानंतर मांडावर नवसाची पूर्तता झाली आणि गाऱ्हाण्यातून मांडावरील विसर्जनासाठी आलेल्या गणपतीसमोर नवस बोलण्यात आले. सामूहिक गाऱ्हाण्यानंतर गणेशमूर्तींची वाजतगाजत वाहनावरून तरीपर्यंत मिरवणूक काढून भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले. बाप्पा मांजरेकर, अरुण केरकर, विलास मांजरेकर, राजू केरकर, धनंजय केरकर, श्री. तानवडे, मेघःश्याम बागकर, प्रशांत मांजरेकर, प्रभाकर मांजरेकर, शिरोडकर, पवार, पिळणकर, पाटकर आदी कुटुंबीय या सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93654 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..