बांद्यात रांगोळी प्रदर्शनातून सामाजिक संदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांद्यात रांगोळी प्रदर्शनातून सामाजिक संदेश
बांद्यात रांगोळी प्रदर्शनातून सामाजिक संदेश

बांद्यात रांगोळी प्रदर्शनातून सामाजिक संदेश

sakal_logo
By

swt519.jpg
48058
बांदाः रांगोळी प्रदर्शनात ‘चाकरमान्यांची वाट पाहणारी माता’ आकर्षण ठरली.

बांद्यात रांगोळी प्रदर्शनातून सामाजिक संदेश
गांधीचौक मंडळाचा पुढाकार ः विविध विषयांवरील रांगोळ्या ठरल्या लक्षवेधी
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ५ः रांगोळीतून वास्तवतेचा आभास आणि सामाजिक संदेश देण्याचा उपक्रम बांदा येथील विठ्ठल मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गांधीचौक मंडळाने राबवला. या उपक्रमात जिल्ह्यातील प्रसिद्ध रांगोळी कलाकारांनी एकापेक्षा एक सरस व सामाजिक संदेश देत काढलेल्या रांगोळ्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्या.
या रांगोळी प्रदर्शनात गणेशाच्या मूर्तींची प्रतिमा साकारली आहे. तर अनेक राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त कलाकार समीर चांदरकर यांनी ''चाकरमान्यांची वाट पाहणारी माता'', ''झाली तयारी बाप्पाच्या आगमनाची'', ''आतुरलेले डोळे पाहती वाट चाकरमान्यांची'' या कलाकृती रांगोळीतून साकारताना वास्तवता विशद केली आहे. तर ऑन ड्युटी असणाऱ्या पोलिसांच्या मनातील भाव ''बाप्पा आला दारी, तरी आम्ही नाही आमच्या घरी'' या रांगोळीतून केदार टेमकर याने साकारत पोलिस कर्मचाऱ्यांच्या मनातील वेदना मांडली आहे.
सिद्धेश धुरी याने ''चौसष्ट कलांचा, चौदा विद्यांचा अधिपती'' हा आविष्कार साकारत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. लहान मुलगी आपल्या लाडक्या बाप्पाकडे मोदकाची मागणी करणारी रांगोळी श्रेया चांदरकर हिने ''दे ना बाप्पा, दे ना मोदक मला!'' यातून साकारली आहे. पर्यावरणाचा संदेश देत मातीचा बाप्पा पूजण्याचा पर्यावरण संदेश ''बाप्पा माझा मातीचा, पर्यावरणाच्या साथीचा'' या रांगोळीतून गौरेश राऊळ याने दिला आहे. सायली भैरे हिने ''तूच करता आणि करविता'' ही अप्रतिम रांगोळी साकारली आहे. गणेशोत्सवानंतर गणेश विसर्जनाच्या वेळी लहान मुलांच्या मनातील भाव ''बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडेना आमुच्या मनाला'' या रांगोळीतून पूर्वा चांदरकरने साकारले असून या सर्वच रांगोळ्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या रांगोळ्या पाहण्यासाठी बांदा शहर तसेच गोव्यातून व ग्रामीण भागातून भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93659 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..