साडवली-देवरुखात गणेशमूर्ती विसर्जन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साडवली-देवरुखात गणेशमूर्ती विसर्जन उत्साहात
साडवली-देवरुखात गणेशमूर्ती विसर्जन उत्साहात

साडवली-देवरुखात गणेशमूर्ती विसर्जन उत्साहात

sakal_logo
By

देवरुखात गणेशमूर्ती विसर्जन उत्साहात
साडवली, ता. ६ ः गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात ढोलताशे वाजंत्री आणि गुलालाची उधळण करत मिरवणुकीने देवरूखला गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. चतुर्थीपासून सुरू झालेल्या गणेशोत्सवातील घरगुती गणेशमूर्तींचे नदीघाटावर उत्साहात विसर्जन करण्यात आले.
सप्तलिंगी नदीवर ठिकठिकाणच्या विसर्जन घाटावर सामूहिक आरत्यांचे सूस्वर निनादले. वरची आळी, शाळा नं. १, खालची आळी या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनासाठी भाविकांची गर्दी होती. देवरूख नगरपंचायतीने नदीघाट स्वच्छतामोहीम राबवली होती. निर्माल्य संकलनाची सोय करण्यात आली होती. नगरपंचायत आपत्कालीन कक्षातील कर्मचारी सामुग्रीसह तैनात होते. राजू काकडे हेल्प अॅकॅडमी कार्यकर्ते तीन ठिकाणी तैनात होते. खालची आळी येथे श्री सत्यनारायण प्रासादिक बालमित्रचे कार्यकर्ते सेवा देत होते.
देवरूख पोलिस व होमगार्ड यांचा चोख बंदोबस्त होता. पावसाने विश्रांती घेतल्याने भाविकांनी मोठ्या उत्साहात मिरवणुका काढल्या. पाच वाजता पावसाने थोडी हजेरी लावली. सायंकाळी ७ वाजेपर्यंत गणेशमूर्ती विसर्जन सोहळा सुरू होता. सायं. साडे सहा वाजता देवरूख एसटी आगारातून चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी जादा बसेस सोडण्यात आल्या. रात्रीपर्यंत एकूण २२ जादा बसेस सोडण्यात आल्या.

------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93663 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..