आधारकार्डला मतदान कार्ड लिंकच्या शिबिराला प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आधारकार्डला मतदान कार्ड लिंकच्या शिबिराला प्रतिसाद
आधारकार्डला मतदान कार्ड लिंकच्या शिबिराला प्रतिसाद

आधारकार्डला मतदान कार्ड लिंकच्या शिबिराला प्रतिसाद

sakal_logo
By

आधारला मतदान कार्ड
लिंकच्या शिबिराला प्रतिसाद
रत्नागिरी, ता. ६ः राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत कोकण नगर येथे प्रभाग ४ मध्ये आधारकार्डला मतदान कार्ड लिंक करून घेण्याचा एकदिवसीय शिबिर घेण्यात आले. या वेळी १५० हून अधिक मतदान कार्ड लिंक करून घेण्यात आले तर ७९ जणांनी नवीन मतदान ओळखपत्रासाठी नोंदणी केली.
शिबिरामध्ये मतदान ओळखपत्रातील दुरुस्ती करून देण्यात आले. या उपक्रमांबद्दल स्थानिक जनतेकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा महासचिव नौसीन काझी यांच्यामार्फत करण्यात आले तसेच त्यांना प्रभाग महिला अध्यक्ष मुनवर-सुलताना फरहान मुल्ला, महिला तालुकाध्यक्ष शमीम नाईक, शहर उपाध्यक्ष धुर्धना प्रभुळकार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या वेळी समाजोपयोगी कार्यक्रम यापुढेही आम्ही राबवत राहणार असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर युवा नेते फरहान मुल्ला यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93679 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..