रत्नागिरी ः जिल्ह्यातील सर्व एटीएममध्ये सुरक्षारक्षक नेमा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः जिल्ह्यातील सर्व एटीएममध्ये सुरक्षारक्षक नेमा
रत्नागिरी ः जिल्ह्यातील सर्व एटीएममध्ये सुरक्षारक्षक नेमा

रत्नागिरी ः जिल्ह्यातील सर्व एटीएममध्ये सुरक्षारक्षक नेमा

sakal_logo
By

सर्व एटीएममध्ये सुरक्षारक्षक नेमा
डॉ. गर्ग यांच्या सूचना ; चिपळुणातील चोरीनंतर बँकांची बैठक
रत्नागिरी, ता. ५ ः चिपळूण येथील एटीएम मशिन फोडून चोरीचा प्रकार घडल्यानंतर जिल्ह्यातील बँकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. एटीएम मशिन बसवलेल्या ठिकाणी २४ तास सुरक्षारक्षक नेमण्यासह सीसीटीव्ही लावण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी दिली.
चिपळूण बोगाटे येथील बँकेचे एटीएम मशिन गॅस कटरच्या साह्याने फोडून चौदा लाख रुपये चोरले होते. यामध्ये तीन संशयित चोरट्यांना पोलिसांनी २४ तासात अटक केली आहे. अशाप्रकारच्या घटना होऊ नयेत, यासाठी पोलिसांनी उपाययोजना करण्यास सुरवात केली आहे. पोलिस अधीक्षक गर्ग यांनी रत्नागिरीतील सर्व बँकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. एटीएम मशिनच्या सुरक्षेविषयक सूचना दिल्या. रत्नागिरी जिल्ह्यात अडीचशेहून अधिक एटीएम मशिन आहेत. त्यातील अनेक ठिकाणी सुरक्षारक्षक नसल्याचे आढळून आले आहे. त्या वेळीही सुरक्षारक्षक नेमण्यात आले नव्हते. त्यानंतर राज्यात एटीएम मशिन फोडून चोरीचे प्रकार घडत असल्याचे पुढे आले.
चिपळुणातील प्रकार घडल्यानंतर पोलिस यंत्रणांनीही एटीएमच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना करण्याच्या सूचना बँकांना दिल्या आहेत. आरबीआयच्या निकषांचे योग्य पद्धतीने पालन करा, असेही बैठकीत सांगण्यात आले. येत्या काही दिवसांत बहुसंख्य मशिनच्या ठिकाणी सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली जाईल, असे बँकांकडून आश्‍वासन पोलिसांना दिल्याचे डॉ. गर्ग यांनी सांगितले.

चौकट
शहरात ५६ ठिकाणी सीसीटीव्हीचे जाळे
रत्नागिरी शहरातील ५६ पॉइंटवर अत्याधुनिक बनावटीचे सीसीटीव्ही कॅमरे बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी नियोजनमधून एक कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्याचा फायदा चोरट्यांना पकडण्यासाठी होऊ शकतो, असा विश्‍वास डॉ. गर्ग यांनी व्यक्त केला. यापूर्वी बसवण्यात आलेल्या ठिकाणीही अत्याधुनिक बनावटीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचाही प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93698 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..