चिपळूण - गौरी गणपतीला साश्रूनयनांनी निरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण - गौरी गणपतीला साश्रूनयनांनी निरोप
चिपळूण - गौरी गणपतीला साश्रूनयनांनी निरोप

चिपळूण - गौरी गणपतीला साश्रूनयनांनी निरोप

sakal_logo
By

चिपळुणात गौरी गणपतीला साश्रूनयनांनी निरोप
चिपळूण, ता. ५ ः बुद्धी आणि ज्ञानाचा अधिपती असलेल्या गणरायाला सोमवारी (ता. ५) भावपूर्ण वातावरणामध्ये निरोप देण्यात आला. माहेरचा पाहूणचार घेऊन निघालेल्या गौराईलाही भक्तांनी साश्रूनयनांनी निरोप दिला. ढोलताशांचा गजर, टाळ मृदुंगाचा नाद आणि बाप्पाच्या जयघोषात भक्तिमय वातावरणात तालुक्यातील नदी, खाडीकिनारी तसेच कृत्रिम तलावात आज गौरी-गणपतींचे विसर्जन करण्यात आले.
दिवसभरामध्ये २० हजाराहून अधिक गणपती आणि १० हजाराहून गौरी आणि १ सार्वजनिक गणपतीचे विसर्जन करण्यात आले. विसर्जनासाठीची नागरिकांनी ठिकठिकाणी गर्दी केली होती. काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली; परंतु गणेशभक्तांनी कोणतीही तक्रार न करता मार्ग काढत गणेश विसर्जन केले. एकत्रित पूजा केल्यानंतर गणेशमूर्तींचे पूजन केले जात होते. त्यामुळे विसर्जन घाट भक्तांच्या गर्दीने फुलून गेले होते.
बहादूरशेख नाका, रामतीर्थ तलाव, गांधारेश्वर, वाशिष्ठी नदी, नाईक कंपनी आदी ठिकाणच्या विसर्जन घाटांवर रात्री उशिरापर्यंत विसर्जन सुरू होते. कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून पोलिस आणि पालिका प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली होती. पोलिसांच्या दिमतीला होमगार्ड, गणेशमंडळाचे कार्यकर्ते आणि पालिकेचे कर्मचारी तैनात होते. पालिका प्रशासनाकडून गेले आठ दिवस विसर्जनाची तयारी सुरू होती. ९० टक्केहून अधिक गणेशमूर्तींचे वाशिष्ठी नदीत विसर्जन झाले तर काही मूर्तींचे कृत्रिम तलाव आणि ग्रामीण भागात खाडीमध्ये विसर्जन करण्यात आले.
चिपळूण पोलिस ठाण्याच्या हद्दीत ९ हजार ५२४ घरगुती आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. सावर्डे पोलिस ठाण्याच्या हद्दीत ९ हजार ८९२ घरगुती तर अलोरे शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत ५ हजार २१२ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93699 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..