रत्नागिरी- बाप्पा मोरया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- बाप्पा मोरया
रत्नागिरी- बाप्पा मोरया

रत्नागिरी- बाप्पा मोरया

sakal_logo
By

48086
-rat5p36.jpg-
संगमेश्‍वर : तालुक्यातील वांद्री कुणबीवाडी येथील ‘श्रीं’ना सोमवारी मिरवणूक काढून निरोप देण्यात आला.

48132

-rat5p49.jpg- : भाट्ये येथे लाईफ जॅकेट वापरून गणेशमूर्ती विसर्जन करताना भाविक.


जिल्हाभरात गणरायाला भावपूर्ण निरोप

पावसाची विश्रांती; मांडवी भक्तगणांनी फुलली

रत्नागिरी, ता. ५ ः गुलालाची उधळण, ढोल-ताशांचा गजर आणि फटाक्यांची आतषबाजी करत ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या,’ असे विनवत जिल्ह्यात गौराईसोबत गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. आज दिवसभर पावसाने विश्रांती घेतल्यामुळे भाविकांच्या आनंद, उत्साहाला पारावार उरला नाही. जिल्ह्यात १४ सार्वजनिक आणि १ लाख १४ हजार ९६५ घरगुती बाप्पांना निरोप देण्यात आला. विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पाडला. पोलिस व जिल्हा प्रशासनाने चोख व्यवस्था ठेवली होती. मांडवी समुद्रकिनारी गणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच, निर्माल्य संकलनालाही चांगला प्रतिसाद मिळाला.
गेल्या आठवड्यात बुधवारी (३१ ऑगस्ट) गणेशचतुर्थीला लाडक्या गणपती बाप्पाचे वाजतगाजत सर्वत्र आगमन झाले. दीड दिवसांची सेवा केल्यानंतर दहा हजार बाप्पांना दीड दिवसांनी निरोप देण्यात आला. शनिवारी घरोघरी गौराईचे आगमन झाले. शनिवारी गौरी पूजन, तर रविवारी जिल्हाभरात सर्वत्र गौराईचा सण साजरा करण्यात आला. आज गौराईसोबत गणपती बाप्पा गावाला निघाले. रिक्षा, चारचाकी गाड्यांमधून बाप्पांची मिरवणूक विसर्जनस्थळी नेण्यात आली. शहरातील रामआळी, गोखले नाका, विठ्ठल-रखुमाई मंदिरमार्गे काँग्रेस भुवन, बंदर रोडमार्गे मांडवी या मार्गावरून विसर्जनाच्या मिरवणुका काढण्यात आल्या. मांडवी समुद्रकिनारी गर्दी झाली. रत्नागिरी शहरात चोख पोलिस बंदोबस्त होता शिवाय वाहतूक पोलिसांनीही चांगली कामगिरी बजावली.
मांडवी किनारी पोलिसांची चौकी उभारण्यात आली होती. तसेच ड्रोन कॅमेऱ्याद्वारे किनाऱ्यावर नजर होती. नगर पालिकेच्या वतीने निर्माल्य संकलनास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. चार ट्रक निर्माल्य संकलित झाले. तसेच, किनाऱ्यावर विसर्जित केले जाणारे निर्माल्यसुद्धा पालिकेचे कर्मचारी संकलित करत होते. मांडवीमध्ये फक्त गणपती नेणाऱ्या वाहनांना प्रवेश देण्यात येत होता. किनाऱ्यावर खेळणी, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावण्यास बंदी केली होती; मात्र मंत्री सामंत यांच्या मध्यस्थीने आज सायंकाळी हे स्टॉल्स लावण्यात आले.
------------------------------
चौकट 1

एक लाखांहून अधिक मूर्तींचे विसर्जन
जिल्ह्यात १४ सार्वजनिक आणि १ लाख १४ हजार ९६५ गणरायांना निरोप देण्यात आला. रत्नागिरी शहरामधील ५ हजार ५३१ घरगुती. तर ४ सार्वजनिक गणेशांचे विसर्जन करण्यात आले. रत्नागिरीच्या ग्रामीण भागात ७ हजार ९९४ घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. जयगड परिसरात १ हजार ७१७ घरगुती आणि १ सार्वजनिक, संगमेश्वर : ९ हजार ११७ घरगुती, राजापूर : १०,६७४ घरगुती, नाटे- ५ हजार ६३२ घरगुती, लांजा : ११ हजार ७७० घरगुती, देवरूख : ८ हजार १७०, सावर्डे : ९ हजार ३२२ घरगुती, चिपळूण : ९ हजार ७७५ घरगुती आणि ३ सार्वजनिक, गुहागर : ९ हजार २० घरगुती, अलोरे : ५ हजार ३०० घरगुती, खेड : १० हजार ६०२ घरगुती व ३ सार्वजनिक, दापोली : २ हजार ५०० घरगुती व १ सार्वजनिक, मंडणगड : ३ हजार ५६ घरगुती व १ सार्वजनिक, बाणकोट : ३९५ घरगुती व २ सार्वजनिक, पूर्णगड : ३ हजार ३५१ घरगुती आणि दाभोळमध्ये १ हजार २७९ घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93714 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..