दुचाकी-मोटार अपघातात बावळाटचे दाम्पत्य जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुचाकी-मोटार अपघातात बावळाटचे दाम्पत्य जखमी
दुचाकी-मोटार अपघातात बावळाटचे दाम्पत्य जखमी

दुचाकी-मोटार अपघातात बावळाटचे दाम्पत्य जखमी

sakal_logo
By

दुचाकी-मोटार अपघातात
बावळाटचे दाम्पत्य जखमी
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ५ ः गणेशदर्शनासाठी दुचाकीने आंबोली येथे गेलेल्या दाम्पत्याला भरधाव मोटारीची धडक बसून अपघात झाला. ही घटना आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास चौकुळ परिसरात घडली. या अपघातात निवृत्ती गावडे व निकिता गावडे (दोघे रा. बावळट) हे दोघे जखमी झाले. अपघातानंतर मोटार चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अधिक माहिती अशी की, गावडे दाम्पत्य आपल्या ताब्यातील दुचाकीने बावळाट येथून आंबोलीतील नातेवाईकांकडे गणेश दर्शनासाठी गेले होते. यावेळी ते चौकुळ परिसरात आले असता भरधाव वेगात जाणाऱ्या मोटारीची त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. यात दुचाकी चालक निवृत्ती यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. तर मागे बसलेला त्यांच्या पत्नीही किरकोळ जखमी झाल्या. या अपघातात दुचाकीचेही मोठे नुकसान झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93717 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..