गौरी गणपतींचे देवगडात विसर्जन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गौरी गणपतींचे देवगडात विसर्जन
गौरी गणपतींचे देवगडात विसर्जन

गौरी गणपतींचे देवगडात विसर्जन

sakal_logo
By

swt525.jpg
48153
देवगड : येथे गौरी गणपतींचे विसर्जन झाले. (छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)

गौरी गणपतींचे
देवगडात विसर्जन
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ५ ः तालुक्यात विविध ठिकाणी आज गौरी गणपतींचे थाटात विसर्जन झाले. पारंपरिक आरत्या म्हणून आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. ''पुढच्या वर्षी लवकर या'' असे आवाहन करीत गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.
बुधवारपासून (ता. ३१) गणेश उत्सवाला सुरुवात झाली होती. घराघरात थाटात गणराय विराजमान झाले होते. वाढती महागाई असली तरीही आपल्या लाडक्या दैवताच्या स्वागतामध्ये काही कमी राहू नये यासाठी गणेशभक्त मग्न होते. नेहमीच्या प्रथेप्रमाणे घराघरात गणेशाचे आगमन झाले होते. त्यातील काही गणपतींचे दीड दिवसांनी तसेच पाच दिवसांनी विसर्जन झाले. यंदा गौरी गणपतींचा मुक्काम सहाच दिवस होता. आज तालुक्यात ठिकठिकाणी गौरी गणपतींचे विसर्जन करण्यात आले. पारंपरिक विसर्जन स्थळावर आरत्या म्हणून गणेश विसर्जन करण्यात आले. ढोलताशांचा गजर आणि फटाक्यांची आतषबाजी करीत गणपतींना भावपूर्ण निरोप देण्यात आला.
................

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93740 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..