चिपळूण ः चिपळूण तालुका कुंभार समाजाची गरूडभरारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः चिपळूण तालुका कुंभार समाजाची गरूडभरारी
चिपळूण ः चिपळूण तालुका कुंभार समाजाची गरूडभरारी

चिपळूण ः चिपळूण तालुका कुंभार समाजाची गरूडभरारी

sakal_logo
By

इंट्रो
चिपळूण तालुका कुंभार समाजाच्या स्वमालकीच्या सुसज्ज व बहुउद्देशीय संत शिरोमणी गोरोबाकाका सभागृहाचे आज उद्घाटन होत आहे. महाराष्ट्र राज्य कुंभार समाजाचे अध्यक्ष सतीश दरेकर, कार्याध्यक्ष महेश सायकर, कोकण प्रकल्प उपअभियंता बबन जगदाळे, श्री. कुंभारगुरूजी आदीच्या उपस्थितित हा सोहळा आहे. या निमित्ताने चिपळूण तालुका कुंभार समाजाच्या यशोगाथेचा आलेख.
- सुनील उर्फ नाना टेरवकर, व्हाईस चेअरमन


चिपळूण तालुका कुंभार समाजाची गरूडभरारी !

" ७० चे दशक. चिपळूण तालुक्यातील समाजाच्या गावात शैक्षणिक संस्थांचा अभाव. शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन (कै.) रत्नू साळवी, (कै.) रामू साळवी, (कै.) शिवराम सि. साळवी, (कै.) बबन पडवेकर, (कै.) कृष्णा सावरटकर, (कै.) तुकाराम पडवेकर, (कै.) शिवराम बापू साळवी, (कै.) बाबाजी भैरवकर, श्री. कुंभारगुरुजी यांच्यासह सोमा गुडेकर, सुदाम साळवी, दत्ताराम पडवेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी खेर्डी येथे श्री दत्तमंदिराशेजारी (कै.) गवळी तथा दाभोळकर गुरूजींच्या दानातून आणि समाजबांधवांच्या श्रमदानातून चिखल मातीची वास्तू उभी केली. तालुक्यातील शेकडो विद्यार्थी येथे वास्तव्य करून नजीकच्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेत असत. तालुक्यातील शेकडो विद्यार्थ्यांनी येथे राहून शिक्षण पूर्ण केले. पुढे (कै.) बबन पडवेकर यांच्या विशेष योगदानातून गोरा कुंभार विकास मंडळाची नोंदणी ३१ मे १९८४ रोजी झाली. नवीन इमारत बांधली. ही इमारत समाजकल्याण विभागाला भाड्याने देऊन तेथे शासकीय मुलींचे वसतिगृह सुरू झाले. समाजबांधवांच्या प्राथमिक आर्थिक गरजा भागवण्यासाठी कुंभारगुरूजींनी सहकाऱ्यांना सोबत घेत २४ जून १९९८ रोजी संत गोरा कुंभार नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना खेर्डी येथे केली.
आठ वर्षांपूर्वी पतसंस्थेच्या कार्यालयाचे स्थलांतर प्रकाश साळवी यांच्या गाळ्यात झाले. ३५ वर्षापूर्वी भिले येथील सुभाष गुडेकर समाजकार्यात सहभागी झाले. गावोगावी फिरून त्यांनी तालुक्यातील समाजबांधवांना प्रवाहात सामील करून घेतले. त्यांनी संघटन केलं. फक्त समाजकार्याला वाहून घेतलं. तालुका संघटनेच्या सीमा भेदून संपूर्ण जिल्ह्यातील समाजबांधवांना एकत्र केले. स्वाभाविक ते जिल्हाध्यक्ष झाले. त्यांच्याच अध्यक्षतेखाली २० जानेवारी २०१९ रोजी खेर्डी येथे १० हजार समाजबांधवांचा जिल्हा मेळावा पार पडला. ते पतसंस्थेचे अध्यक्षही आहेत. आजपर्यंत श्री. कुंभारगुरूजी, सुदाम साळवी व सुभाष गुडेकर यांनी पतसंस्थेचे अध्यक्षपद भूषवले आहे.
संत गोरा कुंभार विकास मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा स्थापनेपासून (कै.) रत्नू तानू साळवी, श्री. कुंभारगुरूजी, (कै.) कृष्णा गणपत सावरटकर, सुभाष गुडेकर, जयंत शिरकर यांनी सांभाळली. ११ वर्षापूर्वी प्रकाशशेठ साळवी मंडळाचे अध्यक्ष झाले. त्यांना अध्यक्षपद नको असतं; तरुण मंडळी नेहमी पुढे यायला हवी अशी त्यांची धारणा असते.पण आम्हा समाजबांधवांना ते पदावर हवे असतात. ते पतसंस्थेचे तज्ञ संचालक आहेत. गतवर्षी आलेल्या महापुरात आमच्या पतसंस्थेचे कार्यालय बुडाले. दोन ते अडीच लाखांचे नुकसान झाले. मात्र जिद्दीने मेहनत घेत पतसंस्था पूर्वपदावर आणली. पुन्हा पुराचा फटका न बसण्यासाठी दूरदृष्टीने खेर्डी येथे चिपळूण-कराड मार्गावर सौरभ चेंबरच्या पहिल्या मजल्यावरील स्वःमालकीच्या जागेत जागा १८ नोहेंबर २०२१ रोजी पतसंस्थेचे समारंभपूर्वक स्थलांतर झाले. पतसंस्थेला कॉर्पोरेटचा लूक दिला. उत्तम कर्मचारीवर्ग असून ठेवींचा ओघ दिवसेंदिवस वाढतोय. बचत ठेव, मुदत ठेव, आवर्तकठेव, अल्प बचत ठेव, सोने तारण, मासिक प्राप्ती ठेव आणि गृहकर्ज आदी व्यवहार चालू आहेत. महावितरणचे वीजबिल भरणा केंद्राची सुविधा आहे. अर्थातच हे सर्व श्रेय त्यांनाच जाते. चिखलमातीने शुभारंभ झालेल्या वास्तूच्या जागेवर आज भव्य दोन वेगवेगळ्या दुमजली इमारती उभ्या आहेत. मंडळाच्या महिला, युवक, वधु-वर सूचक व तंटामुक्त समिती स्थापून सर्वंकष विकासमंडळ काम करत आहे. दरवर्षी गरीब विद्फत वह्या वाटप अन गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात येते. चार दशके कोणतेही मानधन वा भत्ता न घेता सर्व पदाधिकारी समर्पित भावनेने काम करत आहेत. प्रकाशशेठ साळवी यांच्याच विशेष पुढाकाराने दुसऱ्या मजल्यावरील जागासुद्धा संत गोरा कुंभार विकास मंडळाने खरेदी केली. सुसज्ज व बहुउद्देशीय संत शिरोमणी गोराबाकाका सभागृहाचे उद्घाटन आज होत आहे. उत्तरोत्तर मंडळाच्या कार्याला व पतसंस्थेच्या प्रगतीला अधिक बहर यावा, हीच संत शिरोमणी गोरोबाकाका चरणी प्रार्थना !

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93820 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..