सिंधुदुर्ग बॅंकेच्या व्याजदरात वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्ग बॅंकेच्या 
व्याजदरात वाढ
सिंधुदुर्ग बॅंकेच्या व्याजदरात वाढ

सिंधुदुर्ग बॅंकेच्या व्याजदरात वाढ

sakal_logo
By

सिंधुदुर्ग बॅंकेच्या
व्याजदरात वाढ
सिंधुदुर्गनगरी ः मुदत ठेवींच्या व्याजदरामध्ये वाढ करून महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा बँकांमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने नावलौकिक सातत्याने राखला आहे. बँकेच्या ठेवीदारांना त्यांच्या गरजेनुरूप वेगवेगळ्या ठेव योजना बँकेकडून सातत्याने राबविल्या जातात. येत्या गणेश चतुर्थीपासून बँकेने मुदत ठेवीच्या व्याजदरामध्ये ०.२५ टक्के ते ०.५० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील अन्य बँकांच्या तुलनेत सर्वाधिक व्याजदर ठेवीदारांना देण्याचा बँकेचा नेहमीच प्रयत्न असतो. ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व सभासद संस्थांना नियमित व्याजदरापेक्षा ०.५० टक्के वाढीव व्याजदराचा लाभ मिळणार आहे. या वाढीव ठेव व्याजदराचा फायदा बँकेच्या सर्व प्रकारच्या मुदत ठेवीदारांना होणार असून त्याचा लाभ बँकेच्या सर्व ठेवीदार ग्राहकांनी घ्यावा, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे.
---
सिंधुदुर्गात
३२ रुग्ण
सिंधुदुर्गनगरी ः कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी दररोज दोन-चार कोरोना रुग्ण आढळत होते; मात्र सोमवारी नव्याने एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. सक्रिय रुग्णसुद्धा कमी झाले असून सद्यस्थितीत फक्त ३२ सक्रिय रुग्ण आहेत. सिंधुदुर्ग कोरोनामुक्त झाला होता; परंतु पुन्हा थोड्या फार प्रमाणात कोरोना रुग्ण आढळू लागले. गणेश चतुर्थीत जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या लोकांमुळे रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त होत होती; मात्र सुदैवाने रुग्ण आढळले नाहीत. १००च्या जवळपास गेलेली सक्रिय रुग्णसंख्या ३२ वर आली आहे. तसेच नव्याने एकही बाधित आढळलेला नाही.
------------------
‘ई केवायसी’चे
केले आवाहन
सावंतवाडी ः पीएम किसान अंतर्गत लाभार्थ्यांनी ई केवायसी पाच दिवसांत म्हणजे ७ सप्टेंबरपर्यंत न केल्यास त्यांना बारावा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे लाभार्थ्यांनी जवळच्या सीएससी सेंटरला जाऊन लवकरच केवायसी करून घ्यावी, असे आवाहन सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93832 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..