नेरुरमधील ''जंगलातील घरांचा गणपती'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेरुरमधील ''जंगलातील घरांचा गणपती''
नेरुरमधील ''जंगलातील घरांचा गणपती''

नेरुरमधील ''जंगलातील घरांचा गणपती''

sakal_logo
By

48355
नेरूर ः वाघोसेवाडी येथील बाळकृष्ण हळदणकर यांचा जंगलातील घरांचा गणपती.
--
48356
नेरूर ः वाघोसेवाडी घरामध्ये चार पिढ्यापेक्षा अधिक कालावधी असणारे श्री भवानी देवीचे वारूळ. (छायाचित्रे ः प्रकाश हळदणकर)


नेरुरमधील ‘जंगलातील घरांचा गणपती’

आगळी परंपरा; घरातील भवानी देवीचे वारुळ वैशिष्ट्यपूर्ण

अजय सावंत ः सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ६ ः नेरूर-वाघोसेवाडी (ता.कुडाळ) येथील ‘जंगलातील घरांचा गणपती’ आणि त्याच घरामध्ये चार पिढ्यांपेक्षा अधिक कालावधी असणारे ‘श्री भवानी देवीचे वारूळ’ निश्चितच वैशिष्ट्यपूर्ण म्हणावे लागेल. यात नागराजांची वस्ती असल्याचीही श्रद्धा आहे.
सिंधुदुर्गात नेरूर हे क्षेत्रफळाने फार मोठे आणि जास्त वाड्या असणारे गाव आहे. कला, सांस्कृतिक, क्रीडा, धार्मिक सर्वच क्षेत्रात हे गाव नेहमीच अग्रेसर ठरले आहे. याच गावांमध्ये नेरूर-वाघोसेवाडी ही वाडी येते. गावातील माजी पोलिसपाटील बाळकृष्ण हळदणकर या घराण्याचा गणपती जंगलातील घरांचा गणपती म्हणून गेली चार पिढ्या ओळखला जातो आणि विशेष म्हणजे याच त्यांच्या जुन्या घरांमध्ये श्री भवानी देवीचे मोठे वारूळ आहे. या वारुळामध्ये सहा ते सात नागराजांचा वावर असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. याची मनोभावे सेवा केली जाते. एकूणच वाघोसेवाडी येथील जंगलातील घराचा गणपती आणि भवानी देवीचे वारूळ याबाबत माहिती देताना बाळकृष्ण हळदणकर यांचे पुत्र प्रकाश हळदणकर यांनी सांगितले की, नेरूर-वाघोसेवाडी येथील आमचे घर गावातील वस्तीपासून लांब जंगलात आहे. या ठिकाणी आजूबाजूला कोणाचीच घरे नाहीत, त्यामुळे ‘जंगलातील घरांचा गणपती’, अशी आमच्या गणपतीची ओळख आहे. जंगलातून वाटचाल करत वीस मिनिटे चालत जाऊन घर गाठले जाते. या ठिकाणी गणपती पाच ते सात दिवस असायचा. गणेशमूर्ती दरवर्षी वेगळी असायची. यामध्ये एकदाच त्या ठिकाणी सुरुवातीला आरती होत होती. सुरुवातीला भंडारी समाजातील पाच ते दहा माणसे याठिकाणी आरती करण्यासाठी येत होते. मी दहा वर्षाचा असताना या ठिकाणी भजनाची सुरुवात झाली. विशेष म्हणजे एकच आरती या ठिकाणी होत असल्यामुळे नंतरच्या कालावधीत मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कायापालट झाला. त्यावेळी आम्ही लहान असताना या घराच्या गणपतीसाठी येणे जाणे फारच अवघड असल्यामुळे गणेशभक्त मोठ्या प्रमाणात येत नसत. वीस वर्षानंतर मात्र या ठिकाणी बदल झाला. भजन मंडळ आमच्या घरातच तयार झाले. गेल्या २० वर्षापासून या ठिकाणी भजन, आरती मोठ्या प्रमाणात होत आहेत. आजही हा प्रवास पायीच करावा लागतो. निसर्गाच्या सानिध्यात वसलेली ही वाघोसेवाडी तेवढ्याच ताकदीने उभी आहे. संपूर्ण जंगल वनराईने बहरलेल्या या भागात वाघ ब्राह्मण तळी आहे. वाघाचे वास्तव आजही या ठिकाणी आहे. शिवाय अनेक बिबट्यांचे वास्तव्यही या ठिकाणी आहे.’’
---
सात खोल्यांचे घर
‘‘विशेष म्हणजे आमचे हे सात खोल्यांचे मोठे घर असून श्री देवी भवानी देवीचे वारुळ गेल्या चार पिढ्याहुन अधिक कालावधी या ठिकाणी आहे. पूर्ण खोली ही भवानी वारुळासाठी आहे. या ठिकाणी दिवसाढवळ्या संपूर्ण दिवसात सहा ते सात नागाचा वावर आहे. सेवाभावे मनोभावे या वारुळाची पूजा केली जाते. या वारुळातील नागराजांमुळे कधीही आमच्या कुटुंबाला त्रास झालेला नाही. मनोभावे सेवा भक्ती गेल्या चार पिढ्यांहुन अधिक काळ सुरू असून मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी या ठिकाणी मोठा उत्सव साजरा केला जातो,’’ असे श्री. हळदणकर यांनी सांगितले.
------------
कोट
नेरुर-वाघोसेवाडी या मुख्य रस्त्यापासून पूर्ण जंगलमल ठिकाणी किमान वीस मिनिटे आडवाटेने चालत जाऊन घर गाठावे लागते. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या गर्द राईने झाडाझुडपात लपेटलेल्या या घराण्यामध्ये चार पिढ्याहून अधिक काळ जंगलातील घरांचा गणपती ओळखला जातो.
- प्रकाश हळदणकर

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93835 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..