रक्तदान शिबिराला पावशीत प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रक्तदान शिबिराला पावशीत प्रतिसाद
रक्तदान शिबिराला पावशीत प्रतिसाद

रक्तदान शिबिराला पावशीत प्रतिसाद

sakal_logo
By

swt६४.jpg
४८२९३
पावशी ः रक्तदात्यांना प्रमाणपत्र देताना मंडळाचे पदाधिकारी.

रक्तदान शिबिराला पावशीत प्रतिसाद
कुडाळः श्री गणेश चतुर्थी सणाचे औचित्य साधून संघर्ष मित्रमंडळ (पावशी)च्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या संघर्ष मित्रमंडळाकडून पणदूर येथील संविता आश्रमाला धान्य वाटप करण्यात आले. पावशी ग्रामपंचायत येथे मंडळाच्यावतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. ४० हून अधिक रक्तदात्यांनी यात सहभाग घेतला. रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या शिबिर प्रसंगी पावशी सरपंच बाळा कोरगावकर, माजी सरपंच पप्या तवटे, माजी ग्रामपंचायत सदस्य संजय कोरगांवकर, सदस्या वैशाली पावसकर, शिल्पा खोत, चंद्रकांत कुंभार, कृणाल कुंभार, सर्वेश पावसकर उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रणजित देसाई, कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावळे, पोलिस कॉन्स्टेबल ओंकार पाटील, शिवसेना ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर, ओबीसी सेल कुडाळ शहर अध्यक्ष राजू गवंडे यांनी रक्तदान शिबिरास भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी संघर्ष मित्रमंडळ-पावशी यांच्याकडून पणदूर येथील संविता आश्रमास तांदूळ, तूरडाळ, साखर, तेल आदी किराणा माल साहित्य रूपात देणगी म्हणून देण्यात आला.
-----------
सावंतवाडी तालुक्यात पाऊस
सावंतवाडीः तालुक्यात सोमवारी (ता.५) गडगडाटासह पाऊस पडला. विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह सुमारे अर्धा ते पाऊण तास मुसळधार पाऊस कोसळला. पावसामुळे वीज पुरवठा वारंवार खंडित होत होता. काल सकाळपासूनच आकाशात काळे ढग पसरले होते. दमट वातावरणामुळे तापमानातही वाढ झाली होती. दुपारी अडीचच्या सुमारास पाऊसाचे वातावरण झाले. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. तासभरच पडलेल्या पाऊसामुळे मात्र गौरी-गणपती विसर्जनात अडथळा आला नाही.
-------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93840 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..