नाचणी दूर करेल पैशाची चणचण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाचणी दूर करेल पैशाची चणचण...
नाचणी दूर करेल पैशाची चणचण...

नाचणी दूर करेल पैशाची चणचण...

sakal_logo
By

rat६p३.jpg
४८२६९
प्रसाद जोग

धरू कास उद्योगाची ............लोगो


इंट्रो

कोकणातील डोंगरी भागातील गरीब परिस्थिती व आर्थिक चणचणी दूर करण्याचे सामर्थ्य नाचणी प्रक्रिया उद्योगात आहे. नाचणी हे फक्त गरिबांसाठीचे पीक नसून ते गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांना आरोग्यदायी ठेवणारे, पोषणमूल्य देणारे व शाश्वत ग्रामीण उपजीविकेला आधारभूत असणारे महत्वाचे पीक आहे. लोकल टू ग्लोबल व लोकल टू व्होकल होण्याचे सामर्थ्य नाचणी या मिलेट्समध्ये आहे. पोषक तत्त्वांनी युक्त मिलेट्सच्या उत्पादनांना चालना देण्यासाठी आणि त्यात सामील असलेल्या कृषी उद्योगाला बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारने २०१८ हे वर्ष मिलेट्स वर्ष म्हणून साजरे करायला मान्यता दिली होती. आता पुढचे पाऊल उचलण्यात आले आहे.त्याबाबतची माहिती देणारा लेख ..................

- प्रसाद जोग , चिपळूण
--------------------------------------


नाचणी दूर करेल पैशाची चणचण...

येणारे वर्ष सन २०२३ हे वर्ष ‘इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स अर्थात आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष’ म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे. याचाच अर्थ स्थानिक भूभागात पिकणाऱ्या भरड धान्यांना अर्थकारणात महत्वाचे स्थान असून ग्रामीण उपजीविका समृद्ध व बळकट करण्यासाठी ग्रामीण भागातील उद्यमशील तरुणांनी, बेरोजगारांनी स्वतःचे उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी स्थानिक शेती उत्पादनांकडे एक उद्योजकीय संधी म्हणून बघून व ''प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना'' सारख्या योजनांचा अभ्यास करून अन्नप्रक्रिया उद्योगात प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे .
कोकणातील शेतकऱ्यांनी मेहनतीने पिकवलेल्या शेतमालाला प्रत्येक वेळी रास्त भाव मिळतोच असे नाही त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांनी, युवकांनी तुटपुंज्या पगाराच्या नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्नशील राहून आर्थिक संपन्नतेच्या दिशेने वाटचाल करायला हवी.
अलीकडच्या काळातील कृषिविद्यापिठांचे व अन्य शास्त्रीय संस्थांचे अन्नप्रक्रियेसंदर्भातील संशोधनाचे निष्कर्ष हे नाचणीसारख्या पिकांचा आहारात भर देणे किती आवश्यक आहे हे मांडणारे आहेत. नाचणी याला फिंगर मिलेट असेही म्हटले जाते. भातपिकानंतर कोकणात घेण्यात येणारे हे क्रमांक दोनचे महत्वाचे पीक असून जर आपण नाचणीचे मूल्यवर्धित पदार्थ बाजारात आणू शकलो तर प्रक्रियायुक्त नाचणी पदार्थांना स्थानिक व वैश्विक बाजारपेठेतून मोठी मागणी मिळू शकते. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी नाचणी उपयुक्त आहे. नाचणी ही ग्लूटेन फ्री असल्याने डायबेटिक व्यक्तीस आहारात चालू शकणारी आहे. नाचणी ही कोकणात फक्त भाकरीच्या किंवा आंबिलच्या स्वरूपात खाण्यात येत असली तरी नाचणीपासून विविध मूल्यवर्धित पदार्थ बनवता येतात. नाचणीच्या आहारातील वापराची मात्रा (USAGE) जर वाढवता आली तर ओसाड जमिनींवर नाचणी लागवड भविष्यात स्थानिकांकडून केली जाऊ शकते.
काही वर्षांपूर्वी प्रमुख आहार म्हणून नाचणीच्या सेवनाची मोठी परंपरा आपल्या कोकणात होती; पण नंतर बदलत्या जीवनशैलीमुळे व उपलब्धतेच्या तसेच विपणनाच्या अभावामुळे कोकणी माणसाची नाचणी दुर्लक्षित राहील की काय, अशी भीती वाटत असताना कोकणातील बचतगटांनी मात्र या नाचणीपासून नाचणी सत्व, नाचणी लाडू, नाचणी पापड बनवून स्थानिक बाजारपेठेत आपल्या नाचणी उत्पादनांना किती वाव मिळतोय हे आजमावून पाहण्यास सुरवात केली; पण याकडे कोणीही फार मोठी उद्योगसंधी म्हणून पाहिले नाही; पण गेल्या दोन ते तीन वर्षात आलेल्या विविध आजारांमुळे फास्टफूडला पर्याय सगळे आरोग्यस्नेही शोधू लागले व पोषणमुल्यांनी परिपूर्ण असलेल्या नाचणीचा आहारात समावेश करून घेण्यासाठी बरीचशी कुटुंबे तयार झाली. याचा परिणाम मागणीवर होऊन नाचणीलाही अच्छे दिन येऊ लागले.
नाचणी धान्यामध्ये असणाऱ्या सत्त्वयुक्त व पोषक अन्नघटकांचा विचार करता नाचणीला प्रक्रिया उद्योगात महत्वाचे स्थान आहे. नाचणीपासून पीठ तयार करून त्यापासून मुल्यवर्धित उत्पादने स्वयंपाक घरातील छोट्या छोट्या पाककृतीतून अंमलात आणणे शक्य आहे. भाजणे, सोलणे,सडणे, वाफवणे, उकडणे, आंबवणे, मोड आणणे, दळणे, तळणे, सत्त्व काढणे अशा प्रक्रियेतून नाचणीचे विविध पदार्थ बनवण्याचे कौशल्य प्रयत्नपूर्वक शिकून घेतले असता नाचणीचे रुचकर पदार्थ बनवणे हे कठीण काम निश्चितच नव्हे.
नाचणी हे भविष्यातील सुपर ग्लोबल फूड असल्याने कोकणातील उद्योजकांनी दर्जेदार व गुणवत्तापूर्ण नाचणी प्रक्रिया उद्योगाचा विस्तार उद्योजकीय नजरेने व व्यापकदृष्टीने केला असता निर्यात संधी असणारा हा उद्योग कोकणाची आर्थिक गणिते बदलणारा, अर्थकारणाला गती देणारा ठरू शकतो. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील बाणपुरीचे संजीवनी फूडचे अभय पवार हे नाचणी उद्योगात यशस्वी कामगिरी करत असून, भविष्यात नाचणीची विविध मूल्यवर्धित प्रोडक्ट्स ते बाजारात उतरवणार आहेत. कोकोणी तरूणानीही अशी कल्पकता दाखवणे अपेक्षित आहे.
(लेखक उद्योग प्रेरणा प्रशिक्षक आहेत.)
--------------------
चौकट
नाचणीपासून विविध पदार्थ
नाचणी भाकरी, नाचणी पिठापासून थालीपीठ, मोदक, नाचणी सत्व, नाचणी सूप, नाचणी केक, नाचणी आंबील, नाचणी पुडिंग, नाचणी उपमा, नाचणी खीर, नाचणी लाडू, नाचणी शंकरपाळे, नाचणी खारी, बिस्किटे, कुकीज, रागी गोळे, नाचणी पकोडे, नाचणी शक्तीवर्धक पेय, रागी बाऊंटी बार्स, नाचणी कुरकुरे, नाचणी नाचों, नाचणी पोहे असे नाचणीपासून विविध मूल्यवर्धित व विक्रीक्षम पदार्थ बनवून उद्यमशीलतेच्या प्रवासात अग्रेसर राहता येऊ शकते.

------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93848 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..