मंडणगड ः मंडणगडचे सुभेदार अशोक चव्हाणांना '' राष्ट्रपती पदक '' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंडणगड ः  मंडणगडचे सुभेदार अशोक चव्हाणांना '' राष्ट्रपती पदक ''
मंडणगड ः मंडणगडचे सुभेदार अशोक चव्हाणांना '' राष्ट्रपती पदक ''

मंडणगड ः मंडणगडचे सुभेदार अशोक चव्हाणांना '' राष्ट्रपती पदक ''

sakal_logo
By

Rat६p२.jpg ः आतखोल ः राष्ट्रपती सुधारसेवा पदकप्राप्त सुभेदार अशोक चव्हाण यांचा सत्कार करताना आतखोल ग्रामस्थ व उपस्थित मान्यवर.

सुभेदार अशोक चव्हाणांना राष्ट्रपती पदक
मंडणगडचे सुपुत्र ; आतखोल ग्रामस्थांच्यावतीने सत्कार
सचिन माळी ः सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ६ ः स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती सुधारसेवा पदकांमध्ये गुणवत्तापूर्ण सेवेसाठी तळोजा मध्यवर्ती कारागृहाचे सुभेदार अशोक दगडू चव्हाण यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले. चव्हाण यांचे मुळगाव मंडणगड तालुक्यातील सडे हे असून राष्ट्रपती सुधारसेवा पदक मिळवणारे ते तालुक्यातील पहिले आहेत. या पार्श्वभूमीवर आतखोल ग्रामस्थांच्यावतीने ४ सप्टेंबरला त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
सुभेदार अशोक चव्हाण यांचे मंडणगड तालुक्यातील सडे जाधववाडी हे मुळगाव आहे. आपल्या २८ वर्षांच्या सेवेत त्यांनी राज्यात अनेक जिल्ह्यात कर्तव्य बजावले आहे. सध्या ते तळोजा मध्यवर्ती कारागृहाचे सुभेदार म्हणून कार्यरत आहेत. २०२२ या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात त्यांच्या उल्लेखनीय गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राज्यातील ३ जणांना राष्ट्रपती सेवासुधार पदक जाहीर करण्यात आले, त्यात अशोक चव्हाण यांचा समावेश असूनही तालुक्याच्यादृष्टीने अभिमानाची बाब आहे. या सत्कार कार्यक्रमांत त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान करून गाव, पंचक्रोशी, तालुका व जिल्ह्याचे नावलौकिक केल्याने पत्नीसह विशेष सन्मानित करताना उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाट सोबत भारत माताकी जय, वंदे मातरमचा जयघोष केला. त्यांच्या व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आतखोल गावातील दहावी, बारावी, डिप्लोमा, पदवीधर यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी काव्यातून त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळण्यात आली तसेच राष्ट्रप्रेमाच्या भावनेतून करण्यात आलेला हा सन्मान आतखोल गावाची वैचारिक पत उंचावणारा ठरला. अशोक चव्हाण यांनी आभार मानताना आपल्या गाव, पंचक्रोशीतून झालेले कौतुक ही ऊर्जा असल्याचे सांगितले. या प्रसंगी आतखोल ग्रामस्थ, मधुकर शेठ, नीलेश बाणे, अशोक नाडकर, अर्चना बाणे, अनंत येलमकर, सरपंच विश्वनाथ सावंत, शिक्षक गणेश गुळेकर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93861 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..