राजापूर ःमत्स्यशाळेचे एक पाऊल पुढे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ःमत्स्यशाळेचे एक पाऊल पुढे
राजापूर ःमत्स्यशाळेचे एक पाऊल पुढे

राजापूर ःमत्स्यशाळेचे एक पाऊल पुढे

sakal_logo
By

rat६p८.jpg ःP२२L४८३१५ राजापूर ः साखरीनाटे येथील शासकीय मत्स्यशाळा.

मॉडेल स्कूलच्या दिशेने मत्स्यशाळेचे एक पाऊल पुढे

साखरीनाटेला संधी ;२५ लाख ७० हजार रुपयांचा मिळणार निधी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ६ ः राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने आदर्श शाळा (मॉडेल स्कूल) म्हणून निवडलेल्या राज्यातील ३०० शाळांमध्ये तालुक्यातील साखरीनाटे येथील मराठी माध्यमाच्या शासकीय मत्स्यशाळेचा समावेश आहे. या शाळेमध्ये विविधांगी भौतिक आणि शैक्षणिक सुविधा उभारण्याच्या अनुषंगाने ९० लाख ६७ हजार ७३० रुपयांचा आराखडा बनवण्यात आला असून त्यापैकी सुमारे ३० टक्के निधीला शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार २५ लाख ७० हजार रुपयांचा निधी प्रशालेला मिळणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
या मॉडेल स्कूलच्या माध्यमातून मुलांचा शारीरिक, बौद्धिक व मानसिक विकास ही प्रमुख उद्दिष्टे असून क्रीडा, लेखन, भाषण, अभिनय, गायन यांसह अन्य क्षेत्रातील कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मॉडेल स्कूलमध्ये शैक्षणिक आणि भौतिक सुविधा उभारण्यात येणार आहेत. कोणकोणत्या भौतिक सुविधांची गरज आहे याचे सर्व्हेक्षण करून त्याचा ९० लाख ६७ हजार ७३० रुपयांचा आराखडा येथील शिक्षण विभागाने शासनाकडे पाठवला आहे. या आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी २५ लाख ७० हजार रुपयांच्या निधीला शासनाकडून मंजुरी मिळाल्याची माहिती पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली. मात्र, अद्यापही हा निधी पंचायत समितीकडे शासनाकडून प्राप्त झालेला नसल्याचेही या वेळी स्पष्ट करण्यात आले.
---------------------------

चौकट ः १

आदर्श शाळांचा विकासावर भर
मॉडेल स्कूल शाळांचा भौतिक आणि गुणात्मक विकास करताना विद्यार्थी ज्ञानाची निर्मिती करतील, रचनात्मक आणि आनंददायी शिक्षण अवगत करतील. विद्यार्थ्यांच्या विविध विषयातील फलनिष्पत्ती करणारे उपक्रम राबवण्यावर भर देण्यात येणार आहे. या शाळांमधील मुलांची शैक्षणिक प्रगती, शिकण्याची गती, त्यांचे सामाजीकरण आणि त्यांचा होणारा व्यक्तीमत्व विकास पाहून अन्य शाळांमधील पालक आपल्या मुलांना समृद्ध अशा या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी उत्सुक राहतील या दृष्टिकोनातून या आदर्श शाळांचा विकास करण्यावर भर देण्यात येणार आहे.

----------------
चौकट ः २

शैक्षणिक गुणवत्ताधारक सुविधा
--
पाठ्यपुस्तकांच्या पलिकडे जाऊन शिक्षण
वर्गात उभे राहून वाचनावर भर
भाषा, गणिताच्या मुलभूत संकल्पनांचा विकास,
पुस्तके, संदर्भग्रंथ, इन्साक्लोपिडिया उपलब्ध
स्वयंअध्ययनासोबत गट अध्ययनासारखे उपक्रम
दर शनिवारी दप्तरमुक्त शाळा उपक्रम

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93863 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..