सहकारातील दीपस्तंभ; सुभाषराव चव्हाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहकारातील दीपस्तंभ;  सुभाषराव चव्हाण
सहकारातील दीपस्तंभ; सुभाषराव चव्हाण

सहकारातील दीपस्तंभ; सुभाषराव चव्हाण

sakal_logo
By

rat६p२१.jpg
४८३६१
सुभाषराव चव्हाण

इंट्रो
सहकाराला जीवनाचा अविभाज्य घटक मानून चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी गेली ५१ वर्षे सहकारात काम करून कोकणात सहकार रुजवण्यात मोठे योगदान दिले. त्यांनी चिपळूण नागरिच्या माध्यमातून जनसेवा केली. सर्व समाज घटकातील गोरगरीब, आर्थिक दुर्बल, आर्थिक घटकासाठी ही संस्था सुभाषरावांच्या नेतृत्वाखाली आधारवड बनली आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी देखील ते तरुणांना लाजवेल असे काम करतात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सहकार सभागृहाचे उद्घाटन व सभासदांचा मेळावा आयोजित केला आहे. या निमित्ताने...
---------------------------------

सहकारातील दीपस्तंभ ः सुभाषराव चव्हाण

सुभाषराव चव्हाण यानी अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली. जन्मभूमीची ओढ असल्याने त्यांनी जिल्हा बँकेची नोकरी स्वीकारली. दापोली शाखेत इन्स्पेक्टर म्हणून नियुक्ती झाली. कोकणातील शेतकऱ्याला पूरक उत्पन्न देणारी व्यवस्था निर्माण केली पाहिजे तसेच शेतीबरोबरच छोटे-मोठे व्यवसाय करू इच्छिणाऱ्या गरजूंना सुलभ अर्थपुरवठा करणारी व्यवस्था असायला हवी. रोजगार निर्मिती झाली पाहिजे. याच हेतूने आपल्या नियंत्रणाखाली सहकाराच्या चाकोरीतून काम करणारी बिगरशेती पतसंस्था स्थापन केली. १९ ऑक्टोबर १९९३ ला चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेची मुहूर्तमेढ रोवली.
कोकणात सहकार रुजतो हे चिपळूण नागरीच्या वाटचालीतून सिद्ध होते. संस्थेच्या सभासदांनी दिलेली साथ, मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होत आहे. त्यानी सुमारे ३१ ठेव योजना सुरू केल्या. ठेवी स्वीकारण्यांबरोबरच गरजूंना तत्काळ कर्ज उपलब्ध करून देण्याची स्वतंत्र कार्यपद्धतीने संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे. ते कर्जदाराची स्वतः मुलाखत घेतात. नेमकी महत्वाची माहिती घेऊन कर्जास मंजुरी देतात. यातून बहुतांशी कर्जदार स्वावलंबी बनले आहेत. सर्व समाज घटकातील गोरगरीब आर्थिक दुर्बल छोटे-मोठे व्यावसायिक कर्जदाराची गरज ओळखून तत्काळ कर्ज उपलब्ध करून देऊन कर्जदाराची आर्थिक गरज भागवली आहे. महाराष्ट्रात संस्थेच्या ५० शाखा आहेत.

चौकट
चिपळूण नागरीची स्थिती (ऑगस्ट २०२२ अखेर)
सभासद संख्या १ लाख ३३ हजार ७१५, भागभांडवल ६३ कोटी ५३ लाख रुपये, स्वनिधी १२८ कोटी १९ लाख रुपये, ठेवी ९५८ कोटी ८२ लाख रुपये, कर्ज ७७१ कोटी ९६ लाख रुपये पैकी प्लेज लोन ३३० कोटी ५७ लाख, सोने कर्ज २९७ कोटी ३२ लाख, गुंतवणूक २९७ कोटी ५४ लाख रुपये, मालमत्ता ३० कोटी ८३ लाख, निव्वळ नफा मार्च अखेर १८ कोटी ७६ लाख रुपये आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93893 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..