मोफत एसटीला ज्येष्ठांचा प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोफत एसटीला
ज्येष्ठांचा प्रतिसाद
मोफत एसटीला ज्येष्ठांचा प्रतिसाद

मोफत एसटीला ज्येष्ठांचा प्रतिसाद

sakal_logo
By

मोफत एसटीला
ज्येष्ठांचा प्रतिसाद
कणकवली, ता. ६ ः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास करण्याच्या घोषणेनंतर ज्येष्ठांचा या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, राज्य परिवहन महामंडळाकडे ३४ लाख ८८ हजार ज्येष्ठ नागरिकांनी स्मार्ट कार्डासाठी नोंदणी केली आहे. पैकी ७५ वर्षांवरील ज्येष्ठांची संख्या १४ लाख ६९ हजार असल्याचे परिवहन महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले. रोज राज्यभरातून हजारोंच्या संख्येने ज्येष्ठ या योजनेचा लाभ घेत आहेत. राज्य शासनाने ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना एसटीच्या सर्व सेवांमधून मोफत प्रवास तर ६५ ते ७५ वर्षादरम्यानच्या नागरिकांनाही सर्व सेवांमधून ५० टक्के सवलतीमध्ये प्रवास करता येईल, अशी घोषणा केली. २६ ऑगस्टपासून या योजनेला प्रारंभ झाला. एसटी महामंडळाने या योजनेला ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’, असे नाव दिले आहे. ज्येष्ठांना महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत कुठेही मोफत प्रवास करता येणार आहे. प्रवासादरम्यान आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र तसेच केंद्र आणि राज्य शासनातर्फे निर्गमित केलेले ओळखपत्र यापैकी कुठलेही एक ओळखपत्र वाहकाला दाखविल्यास ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास करता येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93896 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..