निवृत्त शिक्षक देसाईंचा आसोली येथे सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवृत्त शिक्षक देसाईंचा
आसोली येथे सत्कार
निवृत्त शिक्षक देसाईंचा आसोली येथे सत्कार

निवृत्त शिक्षक देसाईंचा आसोली येथे सत्कार

sakal_logo
By

48391
आसोली ः येथील निवृत्त शिक्षक लवू देसाई यांचा सत्कार करताना मान्यवर.

निवृत्त शिक्षक देसाईंचा
आसोली येथे सत्कार

वेंगुर्ले, ता. ६ ः अणसूर-पाल येथील हायस्कूलचे निवृत्त शिक्षक आसोली गावचे रहिवासी लवू देसाई यांचा शिक्षक दिनाचे औचित्य साधून वेतोरे शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य एम. के. गावडे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार केला.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून देशात साजरा करण्यात येतो. ज्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी आपले आयुष्य वेचले आणि निवृत्ती नंतरही विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी माणुसकीच्या नात्याने विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करणाऱ्या आसोली येथील श्री. देसाई यांचा सत्कार त्यांच्या निवासस्थानी श्री. गावडे यांनी सत्कार केला. यावेळी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका प्रज्ञा परब, सुरंगी महिला औद्यागिक फळप्रक्रिया संस्थेच्या चेअरमन सुजाता देसाई, निवृत्त पोलीस अधिकारी भास्कर जाधव, विद्यार्थी प्रथमेश देसाई, साक्षी गावडे, श्रावणी गावडे, भगवान गावडे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93924 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..