आचरा देऊळवाडी, घाडीवाडीत गौरी-गणपतींचे सामूहिक विसर्जन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आचरा देऊळवाडी, घाडीवाडीत
गौरी-गणपतींचे सामूहिक विसर्जन
आचरा देऊळवाडी, घाडीवाडीत गौरी-गणपतींचे सामूहिक विसर्जन

आचरा देऊळवाडी, घाडीवाडीत गौरी-गणपतींचे सामूहिक विसर्जन

sakal_logo
By

48399
आचरा ः येथे गौरी-गणपतींना मिरवणुकीने विसर्जनस्थळी घेऊन जाताना भाविक.

आचरा देऊळवाडी, घाडीवाडीत
गौरी-गणपतींचे सामूहिक विसर्जन
आचरा : आचरा येथे गौरी गणपतीचे काल (ता. ५) सायंकाळी मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले. आचरा देऊळवाडी, घाडीवाडी येथे सामूहिक गौरी विसर्जनाची परंपरा यावर्षीही उत्साहात पार पडली. विठ्ठल मंदिर येथील पाणवठ्यावर वाजत-गाजत गौरींचे विसर्जन करण्यात आले. पारवाडी खाडी, पिरावाडी समुद्रकिनारी गणपती विसर्जनासाठी गर्दी झाली होती.
...............
48400
मंदार सांबारी

मंदार सांबारींना पुरस्कार जाहीर
आचरा : आचरा व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष आणि प्रसिद्ध कवी मंदार सांबारी यांना नक्षत्रांचे देणे काव्यमंच, मुख्यालय, पुणे यांच्यावतीने यावर्षीचा मानाचा समजला जाणारा नक्षत्र गौरव पुरस्कार २०२२ जाहीर झाला. संस्थेचे संस्थापक-राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र सोनावणे यांनी हा पुरस्कार जाहीर केला आहे. हा पुरस्कार १८ सप्टेंबरला पुणे येथे होणाऱ्या २३ व्या राज्यस्तरीय श्रावणी काव्य मैफल स्पर्धेत वितरीत केला जाणार आहे. सांबारी यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे व्यापारी संघटनेचे पदाधिकारी अर्जुन बापर्डेकर, जयप्रकाश परुळेकर, माणिक राणे, पंकज आचरेकर, साहित्यिक सुरेश ठाकूर आदींनी अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93933 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..