पनवेल ः सामाजिक भान जपणारा मोहोचा ‘एक गाव, एक गणपती’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पनवेल ः सामाजिक भान जपणारा मोहोचा ‘एक गाव, एक गणपती’
पनवेल ः सामाजिक भान जपणारा मोहोचा ‘एक गाव, एक गणपती’

पनवेल ः सामाजिक भान जपणारा मोहोचा ‘एक गाव, एक गणपती’

sakal_logo
By

‘एक गाव, एक गणपती’ परंपरा ६९ वर्षांची

मोहो गावचे वैशिष्ट्य ; सार्वजनिक गणेशोत्सवाचा खरा आदर्श

पनवेल, ता. ६ ः पनवेलपासून सहा किमी अंतरावर असलेल्या मोहो गावात ‘एक गाव, एक गणपती’ या संकल्पनेला ६९ वर्ष पूर्ण झाली आहेत. कोरोनाच्या महामारीतही ही परंपरा कायम राखली आहे. लोकमान्य टिळकांनी समाजाला जोडण्यासाठी, एकत्र आणण्यासाठी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा मोहो ग्रामस्थांनी जपून आदर्श उभा केला आहे.
‘एक गाव, एक गणपती’ सारखी संकल्पना क्वचितच दिसून येते. अशीच ‘एक गाव, एक गणपती’ची संकल्पना मोहो गावाने गेल्या ६९ वर्षांपासून अविरतपणे सुरू ठेवली आहे.साधारणपणे २ हजार लोकसंख्या असलेल्या मोहो गावातील ‘एक गाव, एक गणपती’ उत्सवाचे यंदाचे ६९ वे वर्ष आहे. गणेशोत्सव काळात काकडा, हरिपाठ, श्री ज्ञानेश्‍वरी पारायण, प्रवचन, कीर्तन, जागर भजन यांसारखे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कोणत्याही घरी घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना केली जात नाही. गावातील श्री हनुमान मंदिरात बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते. विशेष म्हणजे मोहो गावात पक्षभेद, मतभेद, वादविवाद, भांडणतंटे विसरून ग्रामस्थ गुण्यागोविंदाने एकत्र येत गणेशाची अनंत चतुर्दशीपर्यंत अखंड दिवसरात्र सेवा करत असतात. बाप्पाची आरसही पर्यावरणपूरक आणि सामाजिक संदेश देणारी असते.
--------------------------
चौकट
अखंड वीणा
गावातील प्रत्येकाला बाप्पाच्या सेवेचा लाभ मिळावा यासाठी प्रतिदिन ३५ ते ४० घरे गणपतीच्या सेवेसाठी नेमली जातात. विशेष म्हणजे, गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत वीणा जमिनीवर न ठेवता, वीणा पहारा केला जातो. अनंत चतुर्दशीच्या दिवशी वारकरी सांप्रदायातील मंडळींच्या भजन व पारंपरिक वाद्यांच्या मिरवणुकीद्वारे बाप्पाचे विसर्जन केले जाते. वाद असले तरीही गणेशोत्सवकाळात गावाची एकी अबाधित असल्याचे दिसून येते.

अशी झाली सुरवात
गावातील ऐक्य अबाधित राहावे यासाठी गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ सीताराम शेळके, बाळू पाटील, दुनकूर पाटील, काथोर म्हात्रे, तुकाराम पाठे, रामदास पाटील, दत्तू पाटील, बारकू पाटील, गणपत म्हात्रे, सीताराम पाटील, सावळाराम पाटील, धोंडू पाटील, मारूती फडके, विठ्ठल कडव यांनी ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना १९५४ मध्ये पुढे आणून गावातील हनुमंत मंदिरात गणपतीची प्रतिष्ठापना केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93962 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..