खेड ः एसटी गाडी बदलल्याने प्रवाशांना भुर्दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड ः एसटी गाडी बदलल्याने प्रवाशांना भुर्दंड
खेड ः एसटी गाडी बदलल्याने प्रवाशांना भुर्दंड

खेड ः एसटी गाडी बदलल्याने प्रवाशांना भुर्दंड

sakal_logo
By

ऑनलाइन तिकिट काढलेल्यांकडून सक्तीची वसुली
एसटीचा कारभार ; गाडी बदलल्याचा भुर्दंड प्रवाशांना
खेड, ता. ६ ः गणेशोत्सव काळात अनेक प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बससेवेच्या मालक-चालकांनी अव्वाच्यासव्वा भाडे आकारणी करून प्रवाशांची लूट केल्याचे अनेक तक्रारीद्वारे उघड झाले असताना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानेदेखील गाडी बदलल्याचे कारण पुढे करून वाहकांमार्फत ऑनलाइन तिकिट काढलेल्या प्रवाशांसह सर्वच प्रवाशांकडून जादा भाडे वसूल केल्याची घटना चर्चेत आली आहे.
२ सप्टेंबर २०२२ ला सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास स्वारगेट पुणे या स्थानकातून महाडकडे येण्यासाठी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास स्वारगेट विन्हेरे अशी ऑर्डिनरी एक्सप्रेस प्रकारची बस सोडण्यात येणार असल्याने अनेकांनी पुणे येथून महाडकडे येण्यासाठी ऑनलाइन तिकिटाचे बुकिंग करून पेमेंट केले. या वेळी अचानक सामान्य गाडीऐवजी निमआराम बस (एमएच ०६ एस ८९६३) या मार्गावर सोडून प्रवाशांना स्वारगेट तसेच पुणे शहराच्या अन्य भागातून गाडीमध्ये प्रवेश देत एसटी वाहकामार्फत महाडच्या प्रत्येक प्रवाशामागे ७५ रुपयांपर्यंत तिकिटदरातील फरकाची रक्कम वसूल करण्यात आली. यामुळे संतप्त प्रवाशांनी वाहकासोबत हुज्जत घातली.
या वेळी काही प्रवाशांनी महाड एसटी आगाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कोणत्याही प्रकारचे सौजन्य या प्रवाशांना दाखवण्यात आले नाही. ज्या ज्या ठिकाणी ऑनलाइन तिकिट बुकिंग करून महाडपर्यंतच्या प्रवासासाठी प्रवासी गाडीमध्ये चढले त्या सर्वच ठिकाणी वाहकाकडून तिकिटातील फरकाची रक्कम मागण्यात आल्याने वाहक आणि प्रवाशांमध्ये शाब्दिक वादावादी होत असल्याचे दिसून आले. प्रत्येकवेळी या फरकाच्या रक्कमेचे डिफरन्स तिकिट या वेळी वाहकाकडून प्रवाशांना देण्यात आले.
मजल दरमजल प्रवास करत या गाडीने प्रवाशांना महाड एसटी आगारामध्ये आणल्यानंतर अनेकांनी महाड कंट्रोल केबिनमध्ये फरकाच्या रक्कमेच्या वसुलीबाबत तक्रार केली असता साध्या बसऐवजी निमआराम बसमधून प्रवास झाला ना, आता कशाला फरकाच्या रक्कमेबाबत बोलताय, असे समजवण्याचा प्रयत्न झाल्याने अनेक प्रवासी निरुत्तर होऊन आपापल्या घरी परतले;


ऑनलाइन रिटर्नची मागणी
मात्र, साध्या गाडीऐवजी निमआराम बस सोडून साध्या गाडीच्या प्रवाशांना फरकाची रक्कम अदा करण्यास भाग पाडणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नियंत्रकांना याबाबत जाब विचारून वरिष्ठांनी ऑनलाइन पेमेंट करणाऱ्या एसटी प्रवाशांकडून रोख रकमेस्वरूपात घेतलेली फरकाची रक्कम ऑनलाइन रिटर्न करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93964 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..