रत्नागिरी ः केंद्र शासन पुरस्कार सन 2022 साठी नामांकने सादर करावीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः केंद्र शासन पुरस्कार सन 2022 साठी नामांकने सादर करावीत
रत्नागिरी ः केंद्र शासन पुरस्कार सन 2022 साठी नामांकने सादर करावीत

रत्नागिरी ः केंद्र शासन पुरस्कार सन 2022 साठी नामांकने सादर करावीत

sakal_logo
By

केंद्रीय युवा पुरस्काराच्या
प्रस्तावासाठी २० पर्यंत मुदत
नामांकन सादर करण्याचे खेळाडूंना आवाहन
रत्नागिरी, ता. ६ ः युवा कार्यक्रम, खेल मंत्रालय,भारत सरकार, नवी दिल्ली यांनी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, खेळामध्ये यश संपादन केल्याबद्दल ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार, मौलाना अब्दुल कलाम आझाद ट्रॉफी (विद्यापीठांकरिता), द्रोणाचार्य पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार, अर्जुन ॲवॉर्ड, २०२२ करिता पुरस्कारासाठी नामनिर्देशनाचा प्रस्ताव २० सप्टेंबरला केंद्र शासनास सादर करावा.
केंद्र शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांकरिता रत्नागिरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी नामांकने सादर करावीत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे. विहित कालावधीनंतर प्राप्त होणारे अर्ज अथवा अपूर्ण अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे सूचित केले आहे. तसेच यावर्षीपासून पात्र खेळाडूंनी पुरस्काराकरिताच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अर्जदारांनी स्वत: फक्त ऑनलाइन पोर्टलद्वारे विहित नमुन्यातील अर्ज कोणत्याही विभागाची/अथवा व्यक्तींची शिफारस न घेता थेट केंद्र शासनास dbtyas-sports.gov.in या पोर्टलवर/वेबसाइटवर सादर करावे तसेच ऑनलाइन अर्जाबाबत काही अडचण आल्यास Department of Sports At section.sp४-moyas@gov.in किंवा ०११-२३३८७४३२ या संपर्क क्रमांकावर कार्यालयीन दिवशी कार्यालयीन वेळेत सकाळी ९ ते सायं. ५.३० पर्यंत संपर्क करता येणार आहे. तसेच केंद्र शासनाच्या विविध पुरस्काराची सविस्तर माहिती, नियमावली व विहित नमुना अर्ज https://yas.nic.in/sports या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93985 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..