रत्नागिरी ः रत्नागिरी तालुक्यात पंचतारांकीत एमआयडीसी आणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः रत्नागिरी तालुक्यात पंचतारांकीत एमआयडीसी आणा
रत्नागिरी ः रत्नागिरी तालुक्यात पंचतारांकीत एमआयडीसी आणा

रत्नागिरी ः रत्नागिरी तालुक्यात पंचतारांकीत एमआयडीसी आणा

sakal_logo
By

रत्नागिरी तालुक्यात हवी पंचतारांकित एमआयडीसी

मिलिंद कीर; सामंत यांच्या मंत्रिपदाचा फायदा जिल्ह्याला होऊ द्या
रत्नागिरी, ता. ६ ः जिल्ह्यातील तरुणांना बेरोजगारीमुळे नोकरी आणि व्यवसायासाठी जिल्ह्याबाहेर विस्थापित व्हावे लागत आहे. त्यामुळे आता उद्योगमंत्री या नात्याने रत्नागिरी तालुक्यात पंचतारांकित एमआयडीसी आणावी, अशी मागणी मंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद कीर यांनी सांगितले.

याबाबतचे निवेदन उद्योगमंत्र्यांच्या कार्यालयात दिले आहे. ही माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ‘रत्नागिरी तालुक्यात २००४-०५ दरम्यान पंचतारांकित एमआयडीसी मंजूर झाली होती; मात्र, विरोधानंतर ती तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे म्हणजेच कागलला (ता. कोल्हापूर) नेण्यात झाली. आज तेथे ८० ते ९० हजारांहून अधिक लोकांना रोजगार मिळाला आहे. जिल्ह्यातील तरुणांना बेरोजगारीमुळे विस्थापित व्हावे लागते. या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे आता उद्योगमंत्री या नात्याने रत्नागिरी तालुक्यात पंचतारांकित आणणे काळाची गरज आहे.’
ते म्हणाले, ‘प्रदूषणविरहित उद्योग व कारखाने यावेत, यासाठी आणि रोजगार मिळण्यासाठी स्थानिकांकडून आग्रह धरला जात आहे. गेली अठरा वर्षे सामंत हे आमदार आहेत. त्यांनी यापूर्वीही विविध मंत्रिपदे भूषवली आहेत. सत्तेत असतानाही त्या-त्या वेळच्या उद्योगमंत्र्यांकडून एखादा उद्योग रत्नागिरी तालुक्यात त्यांनी आणणे अपेक्षित होते; परंतु त्यांना तसे करता आले नाही. आज उद्योगमंत्रीपद आहे. त्या माध्यमातून रत्नागिरी विधानसभा मतदार संघात पंचतारांकित एमआयडीसी मंजूर करावी जेणेकरून नोकरी, व्यवसायाचे प्रश्न सुटतील. लोकांना स्वतःच्या शहरामध्ये राहून नोकरी, व्यवसाय करण्याची संधी प्राप्त होईल,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेवेळी राष्ट्रवादीचे नीलेश भोसले उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93996 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..