गुहागरातही शिंदे गटाला देणार बळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुहागरातही शिंदे गटाला देणार बळ
गुहागरातही शिंदे गटाला देणार बळ

गुहागरातही शिंदे गटाला देणार बळ

sakal_logo
By

rat6P24.jpg--KOP22L48434
गुहागर ः उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्वागत करताना शिवसेनेचे माजी पदाधिकारी नरेश पवार आणि अन्य शिवसैनिक

गुहागरातही शिंदे गटाला देणार बळ
मंत्री सामंत यांचा तळी दौरा ; नाराजी सावधानतेने
गुहागर ता. ६ : शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीनंतर गुहागरातील शिवसैनिक शिंदे गटात जाणार, अशी जोरदार चर्चा सुरू होती. याच पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी (ता.5) गुहागर दौऱ्यावर येऊन येथील शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेतल्याने गुहागरातही शिंदे गट सक्रिय होण्याच्या चर्चेवर शिक्कमोर्तब झाले आहे.
मंत्री उदय सामंत यांनी भास्कर जाधव यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन त्यांना आव्हान दिल्याचे मानले जात आहे.
येत्या काही दिवसातच शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
रविवारी गुहागरातील एकही कार्यकर्ता शिंदे गटात जाणार नाही, असा दावा तालुका प्रमुख सचिन बाईत यांनी केला होता. मात्र शिवसेनेतील एक गट आमदार भास्कर जाधव यांच्यावर पूर्वीपासूनच नाराज होता. शिवसेनेतील बंडाळीनंतर हा गट योग्य संधीची वाट पहात होता. तोपर्यंत जाहीररित्या या गटाने आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. उद्योगमंत्री सामंत यांच्या भेटीमुळे या गटाला बळ मिळाले आहे. आता या संधीचा फायदा घेऊन उद्योगमंत्री सामंत आणि शिंदे गटातील ज्येष्ठ नेते रामदास कदम गुहागरातही शिंदे गटाचे प्राबल्य कसे वाढवितात हे पाहणे औत्युक्याचे ठरणार आहे.
शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे शिवसेनेत दोन गट तयार झाले आहेत. महाडचे आमदार भरत गोगावले, दापोलीचे आमदार योगेश कदम व रत्नागिरीचे आमदार उदय सामंत हे शिंदे गटात सहभागी झाले.
जिल्ह्यात केवळ गुहागरचे भास्कर जाधव आणि राजापूरचे राजन साळवी हे दोन आमदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आहेत. कोकणातील शिवसेना मजबुत करण्यासाठी आमदार भास्कर जाधव नुकतीच नेतेपदी निवड झाली. त्याबद्दल गुहागर शिवसेनेने रविवारी त्यांचा सत्कार केला. त्यावेळी आमदार जाधव यांनी शिंदे गटावर आक्रमक टीका केली. या पार्श्वभुमीवर सोमवारी ( ता.5) उद्योगमंत्री उदय सामंत गुहागरमध्ये आले. त्यानी शृंगारतळीच्या सार्वजनिक गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर येथील एका हॉटेलमध्ये गुहागरातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा स्वीकारल्या.

चर्चा झाली सुरू
शृंगारतळी येथे एका हॉटेलमध्ये नरेश पवार, अनंत चव्हाण, नारायण गुरव, तानाजी चव्हाण, मयुर भोसले, गुंडा विचारे, मुन्ना तावडे आदी शिवसैनिकांनी सामंत यांच्याजवळ चर्चाही केली. मात्र सदर भेट उद्योगमंत्री म्हणून शुभेच्छा देण्यासाठी घेतल्याचे या शिवसैनिकांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93998 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..