गणेशोत्सवाच्या धामधुमीत ई-केवायसीची मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सवाच्या धामधुमीत ई-केवायसीची मोहीम
गणेशोत्सवाच्या धामधुमीत ई-केवायसीची मोहीम

गणेशोत्सवाच्या धामधुमीत ई-केवायसीची मोहीम

sakal_logo
By

गणेशोत्सवाच्या धामधुमीत
ई-केवायसीची मोहीम
ई-केवायसी न केलेले १२ हजार ७५९ लाभार्थी
गुहागर, ता. ६ ः पीएम किसान (PM Kisan) ई-केवायसीकरिता गुहागर तालुक्यातील १२२ गावांमध्ये तलाठी, कृषीसहाय्यक व ग्रामसेवकांना कामगिरीवर काढले आहे. अजूनही १२ हजार ७५९ लाभार्थ्यांची केवायसी प्रलंबित असून ७ सप्टेंबरपर्यंत ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन गुहागर तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी केले आहे.
गुहागर तालुक्यात पीएम किसानचे एकूण २१ हजार २९८ लाभार्थी आहेत. यातील ८ हजार ५३९ लाभार्थीचे पीएम किसानला आधार जोडलेले आहेत. यामुळे शिल्लक राहिलेल्या १२ हजार ७५९ लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण करून घेण्यासाठी गुहागर तहसीलच्यावतीने नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी १२२ गावांमधील ३० गावे तलाठी यांच्याकडे, ५७ गावे कृषीसहाय्यकाकडे तर ३५ गावे ग्रामसेवकांकडे देण्यात आली आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना दिलेल्या गावांप्रमाणे केवायसी न जोडलेल्या लाभार्थ्यांची यादी देण्यात आली आहे. ज्यांचे आधारकार्डला मोबाईल जोडले आहेत ते स्वतच्या मोबाईलद्वारे केवायसी जोडू शकतात अन्यथा तालुक्यातील ई-सेवा केंद्र व सीएससी केंद्रांमध्ये पीएम किसानला आधार जोडणी करावी. यासाठी तालुक्यातील १४ महा ई-सेवा केंद्र व ४० सीएससी सेंटर सुट्टीच्या दिवसातही सुरू ठेवली आहेत.
दोन टप्प्यांमध्ये पीएम किसान यादी अपडेट करण्याचे काम सुरू आहे. लाभार्थ्यांचा जमिन डाटाही पाहिला जात आहे. ज्या लाभार्थ्यांचा मृत्यू झाला आहे, ज्यांच्या नावावरच शेतजमिन नाही अशा लाभार्थ्यांची नावे कमी होणार आहेत. पीएम किसानमधील ४० टक्के लाभार्थी मुंबईतील आहेत. यामुळे गणेशोत्सवामध्ये गावी आलेल्या मुंबईतील लाभार्थ्यांनी जवळपास महा ई-सेवा केंद्र अथवा सीएससी सेंटरमध्ये जाऊन ७ सप्टेंबरपर्यंत पीएम किसान आधार जोडणी करावी. ज्यांची आधार जोडणी होणार नाही त्यांना पुढील १२ पीएम किसानचा हप्ता जमा होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93999 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..