रत्नागिरी ः रत्नागिरीत सीएनजी गॅसचा प्रचंड तुटवडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः रत्नागिरीत सीएनजी गॅसचा प्रचंड तुटवडा
रत्नागिरी ः रत्नागिरीत सीएनजी गॅसचा प्रचंड तुटवडा

रत्नागिरी ः रत्नागिरीत सीएनजी गॅसचा प्रचंड तुटवडा

sakal_logo
By

rat6p22.jpg- KOP22L48410 रत्नागिरी ः सीएनजीसाठी रिक्षाची लागलेली रांग.

रत्नागिरीत सीएनजी गॅसचा प्रचंड तुटवडा
रत्नागिरी, ता. ६ ः गणेशोत्सवात चाकरमान्यांचा परतीचा प्रवास प्रचंड खडतर होत आहे. एकीकडे रेल्वेला गर्दी तर दुसरीकडे सीएनजीच्या तुटवड्यामुळे इच्छितस्थळी पोहचताना चाकरमान्यांना प्रचंड कष्ट घ्यावे लागत आहेत.
गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यामध्ये काही चाकरमानी आपल्या खासगी वाहनाने तर काही रेल्वे, एसटीने आपल्या गावी आले आहेत. सोमवारी गौरी गणपती विसर्जन झाल्यानंतर चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागले आहेत. परतीच्या प्रवासाला लागलेल्या चाकरमान्यांपुढे नवे संकट निर्माण झाले आहे. एकीकडे रेल्वेला प्रचंड गर्दी तर दुरीकडे सीएनजी गॅसचा तुटवडा. रत्नागिरी शहरांमध्ये असलेले सीएनजी पंपावरती मंगळवारी सकाळपासून मोठ्याच्या मोठ्या रांगा लागलेल्या दिसत होत्या. त्यामध्ये जास्त प्रमाणात रिक्षांची संख्या होती. काही पंपावर तर सीएनजी शिल्लक नाही त्यामुळे रिक्षा व्यावसायिकांनाही सीएनजीकरिता आपला व्यवसाय बंद ठेवावा लागला. सीएनजीचा तुटवडा असल्यामुळे रिक्षाचालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94000 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..