अॅटमबॉम्ब हातात फुटून मुलगा जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अॅटमबॉम्ब हातात
फुटून मुलगा जखमी
अॅटमबॉम्ब हातात फुटून मुलगा जखमी

अॅटमबॉम्ब हातात फुटून मुलगा जखमी

sakal_logo
By

अॅटमबॉम्ब हातात
फुटून मुलगा जखमी

वेंगुर्ले, ता. ६ ः मठ येथील वैभव आईर या पंधरा वर्षीय मुलाच्या हातामध्ये रविवारी (ता. ४) रात्री पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करताना अॅटमबॉम्ब फुटला. यात त्याच्या हाताला मोठी दुखापत झाली आहे. ओरोस येथील उपजिल्हा रुग्णालयात त्याच्यावर अधिक उपचार करण्यात आले.
तालुक्यातील मठ येथे पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन सुरू असताना मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. यावेळी वैभव उत्साहात फटाके फोडत असताना अचानक ॲटमबॉम्ब त्याच्या हातात फुटला. तत्काळ त्याला येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने तेथे प्राथमिक उपचार करून त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94026 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..