सावंतवाडी बसस्थानकात गैरसोय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडी बसस्थानकात गैरसोय
सावंतवाडी बसस्थानकात गैरसोय

सावंतवाडी बसस्थानकात गैरसोय

sakal_logo
By

सावंतवाडी बसस्थानकात गैरसोय
सावंतवाडी ः सावंतवाडी एसटी स्थानक आवारात बसेस फलाटावर लावण्यास जागाच मिळत नाही, अशी स्थिती आहे. एसटी गाड्या कशाही पार्क केल्या जातात. त्यामुळे एसटी फलाटावर लावण्यात अडथळा निर्माण होत आहे. ही स्थिती बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या जादा गाड्यांमुळे होत असल्याचे सांगण्यात आले. सावंतवाडी आगाराचे काम अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे समस्या भेडसावत आहेत. पाच दिवसांचे गणेश विसर्जन झाल्यानंतर सोमवारी येथील बसस्थानकात चाकरमान्यांची वर्दळ वाढली होती. त्यात लांब पल्ल्याच्या तसेच जादा गाड्या मोठ्या प्रमाणात सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात जाणाऱ्या फेऱ्या अर्धा ते एक तास उशिराने धावत आहेत.
----------------
प्रफुल्ल जाधवांना पुरस्कार
कणकवली ः सदाशिव पवार गुरुजी प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार यावर्षी श्री महालक्ष्मी विद्यामंदिर कोकिसरे, वैभववाडी येथील शिक्षक प्रफुल्ल जाधव यांना जाहीर झाला. रोख रक्कम ५ हजार, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सदाशिव पवार गुरुजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. सतीश पवार, सचिव शुभांगी पवार यांनी ही माहिती दिली. गतवर्षीपासून सदाशिव पवार गुरुजी प्रतिष्ठानच्यावतीने शिक्षण क्षेत्रात आदर्श कार्य करणाऱ्या शिक्षकांना निवृत्त माजी मुख्याध्यापक सदाशिव पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. तसेच सामाजिक, साहित्य क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. कणकवली येथे लवकरच पुरस्कार वितरण होईल, असे आयोजकांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94052 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..