हळबे महाविद्यालयात गणेशोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हळबे महाविद्यालयात गणेशोत्सव
हळबे महाविद्यालयात गणेशोत्सव

हळबे महाविद्यालयात गणेशोत्सव

sakal_logo
By

48545
दोडामार्ग : हळबे महाविद्यालयात गणेशोत्सवात सहभागी विद्यार्थी, शिक्षक.

हळबे महाविद्यालयात
गणेशोत्सव उत्साहात
दोडामार्ग : येथील लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालयात हॉटेल मॅनेजमेंट विभागाच्या वतीने एकदिवसीय गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
समाजात एकोपा व संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरवात केली. हा गणेशोत्सव आज महाराष्ट्रातील लोकप्रिय सण बनला आहे. गणेशोत्सवात कोकणात घरगुती व सार्वजनिक गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात येते. गणेशोत्सव म्हणजे आनंद, उत्साह आणि भक्तीचा उत्सव. त्या पार्श्वभूमीवर प्रथमच हळबे महाविद्यालयाच्या हॉटेल मॅनेजमेंटतर्फे एकदिवसीय गणेशोत्सव साजरा करण्यात आला. या विभागाचे प्रमुख कौशिक शेट्ये यांच्या हस्ते गणेशपूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध आरत्या, भजने, फुगड्या सादर केल्या. प्राचार्य डॉ. सुभाष सावंत, हॉटेल मॅनेजमेंट विभागाचे प्रमुख शेट्ये, त्यांचे सहकारी रोहन बागकर आणि अशिता नाईक आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी प्रा. शेट्ये, प्रा. बागकर, प्रा. नाईक व हॉटेल मॅनेजमेंट विभागाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
...............
48549
कडावल ः येथे सातव्या दिवशी श्री गणरायांना निरोप देताना भाविक.

सात दिवसांच्या गणरायांना निरोप
कुडाळ ः ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’, ‘गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला’, ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत काल (ता. ६) कुडाळ तालुक्यात सात दिवसांच्या गणरायांचे भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले.
कुडाळ शहरासह ग्रामीण भागात फटाक्यांच्या आतषबाजीत, ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका काढण्यात आल्या. नदी, तलाव, ओहोळ आदी ठिकठिकाणी सात दिवसांच्या गणपतीचे भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. गणेश घाटाच्या ठिकाणी गणेशभक्तांची मोठी गर्दी झाली होती. ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रात्रीपर्यंत गणेश विसर्जनाचा उत्साह सुरू होता. गणेशभक्तांनी मोठ्या उत्साहात बाप्पांना निरोप दिला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94154 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..