महाआवासमध्ये कुडाळ जिल्हास्तरावर अव्वल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाआवासमध्ये कुडाळ जिल्हास्तरावर अव्वल
महाआवासमध्ये कुडाळ जिल्हास्तरावर अव्वल

महाआवासमध्ये कुडाळ जिल्हास्तरावर अव्वल

sakal_logo
By

48547
ओरोस ः प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व रमाई आवास योजने अंतर्गत कुडाळ तालुक्याला प्रथम क्रमांकाने गौरविताना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर व अधिकारी. (छायाचित्र ः अजय सावंत)


‘महाआवास’मध्ये कुडाळ जिल्हास्तरावर अव्वल

उद्दिष्ट पूर्ण; प्रधानमंत्री, रमाई आवासमध्येही चांगले काम

अजय सावंत ः सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ७ ः महाआवास अभियान २.० मध्ये तालुक्याला जिल्हास्तरावर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व रमाई आवास योजने अंतर्गत प्रथम क्रमांकाने गौरविले आहे. या अभियान कालावधीत ४०२ उद्धीष्टांपैकी ३३२ घरकुले मंजुर झाली असून ६० पूर्ण झाली आहेत. रमाई आवास योजनेंतर्गत एकूण ८० घरकुले मंजुर करून घेण्यात आली. कुडाळ तालुक्याने मंजुर ‘ब’ व ‘ड’ यादीतील एकूण मंजुर घरकुल यादी पैकी ११५२ घरकुल शौचालयासह पूर्ण झाली आहेत. रमाई आवास योजनेअंतर्गतही मंजूर यादीपैकी ४६८ घरकुले शौचालयासह पूर्ण आहेत.
विशेष म्हणजे या घरकुलांना रोजगार हमी, जलजीवन मिशन उज्वला योजना, महाऊर्जा अशा विविध योजनांचा लाभ देखील देण्यात आलेला आहे. या अभियानाचा भाग म्हणजे डेमो हाऊस बांधकाम करणे, कॉप शॉप सुरू करणे यांसारखे लाभार्थीमिमुख उपक्रम प्राधान्याने पुर्ण करण्यात कुडाळ तालुका प्रथम क्रमांकावर आहे.
''सर्वासाठी घरे २०२२'' या शासनाच्या धोरणांतर्गत अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना आदिम आवास योजना अटल बांधकाम कामगार आवास योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करणं व गुणवत्ता आणणे यासाठी शासन निर्णय ग्रामविकास विभाग, शासन निर्णय १६ नोव्हेंबर २०२१ अन्वये २०२१-२२ या वर्षामध्ये महाराष्ट्र राज्यात २० नोव्हेंबर २०२१ से ३१ मार्च २०२२ या कालावधीत महा आवास अभियान ग्रामीण २०२१-२२ राबविण्यास मान्यता देण्यात आली असून या अभियानास ३० जून २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अभियान उपक्रमांमध्ये अभियान कालावधीत केलेल्या कामाच्या टक्केवारीच्या आधारे एकत्रित गुणांकन करुन उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हा स्तरावर कुडाळ तालुक्याला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व रमाई आवास योजना या दोन्ही योजनेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. यापूर्वी महाआवास अभियान १.० मध्येही कुडाळ तालुक्याला केंद्र पुरस्कृत व राज्यआवास योजनेमध्ये उत्कृष्ट कामगिरीबाबत विभागीयस्तरावर तृतीय क्रमांकाने गौरविले होते. यामध्ये कुडाळ तालुक्याने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत पात्र ‘ब’ यादीतील एकूण मंजुर घरकुलांपैकी १०९२ घरकुले शौचालयासह पूर्ण करून घेतली.
----
आंब्रडला एकाचवेळी ४७ घरकुले
रमाई व शबरी आवास योजने अंतर्गत एकूण मजुर घरकुलांपैकी ४५७ घरकुले शौचालयासह पूर्ण करून घेतली. महा आवास अभियान १.० मध्ये विभागीयस्तरावर कुडाळ तालुक्यातील ग्रामपंचायत वाडोस प्रथम क्रमांक व राज्यस्तरीय योजनेमध्ये अणाव प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले होते. या अभियानामध्ये जिल्हास्तरावरही तालुक्याला प्रथम क्रमांक मिळाला होता. अभियान कालावधीत ग्रामपंचायत आंब्रड येथे एकाच वेळी ४७ घरकुलांना मंजुरी देवून या घरकुलांचा गृहप्रवेश मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते केला होता.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94155 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..