ध्येयप्राप्तीसाठी एकाग्रता महत्त्वाची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ध्येयप्राप्तीसाठी एकाग्रता महत्त्वाची
ध्येयप्राप्तीसाठी एकाग्रता महत्त्वाची

ध्येयप्राप्तीसाठी एकाग्रता महत्त्वाची

sakal_logo
By

48551
वाघेरी ः पारितोषिक वितरण सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांसमवेत मान्यवर.

ध्येयप्राप्तीसाठी एकाग्रता महत्त्वाची

प्रा. चंद्रकांत साटम ः वाघेरीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ७ : विद्यार्थ्यांनी डोळ्यांसमोर योग्य आदर्श निवडून त्यांच्या गुणांचे अनुकरण केल्यास यश मिळविता येते. मनात आत्महत्येचा विचार आलेले पंडित बाणभट्ट जगासमोर कादंबरीची देणगी देतात, ही प्रेरणा महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन आर. एम. भट्ट ज्युनिअर कॉलेज मुंबईचे प्रा. चंद्रकांत साटम यांनी केले. वाघेरी येथे (कै.) बाळकृष्ण रावराणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पारितोषिक वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
वाघेरी गावातून शिक्षण घेत दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना (कै.) बाळकृष्ण रावराणे व (कै.) माई रावराणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अनुक्रमे ५०००, ३००० व २००० रुपये देऊन, तर प्रत्येक उत्तीर्ण विद्यार्थ्यास १००० रुपये देऊन गौरविण्यात आले. यावर्षीच्या कार्यक्रमात एकूण ५५ विद्यार्थ्यांना पारितोषिक रुपाने देऊन गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर पारितोषिक समितीचे संस्थापक-अध्यक्ष भाई साटम, मराठी साहित्यिक प्रा. वैभव साटम, कार्यक्रमाचे अध्यक्ष वाघेरी सरपंच संतोष राणे, उपसरपंच अनुजा राणे, पोलिस पाटील अनंत राणे, मिलिंद साटम, ट्रस्टी प्रसाद सावंत, प्रवीण सावंत, आत्माराम साटम, मुख्याध्यापिका स्मिता सावंत, शिक्षक विजय पाताडे, जगदीश साटम आदी उपस्थित होते.
पारितोषिक समितीचे भाई साटम यांनी नऊ वर्षे गावातील विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन प्रेरणा देण्याबरोबरच यापुढे गावात दुर्धर आजारग्रस्त असलेल्या गरजूंना मदत देण्याचे जाहीर केले. यावेळी त्यांचा विशेष सत्कार झाला. यावेळी प्रा. साटम, मिलिंद साटम, प्रसाद सावंत यांच्यासह गुणवंत विद्यार्थिनी साक्षी राणे यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतात सरपंच राणे यांनी उपक्रमाचे कौतुक केले. प्रा. राजेश राणे यांनी सूत्रसंचालन केले. श्री. सावंत यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94158 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..