रत्नागिरी ः गणपतीपुळेतील भाद्रपदी गणेशोत्सवाची सांगता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः गणपतीपुळेतील भाद्रपदी गणेशोत्सवाची सांगता
रत्नागिरी ः गणपतीपुळेतील भाद्रपदी गणेशोत्सवाची सांगता

रत्नागिरी ः गणपतीपुळेतील भाद्रपदी गणेशोत्सवाची सांगता

sakal_logo
By

rat7p14.jpg-
48570
गणपतीपुळ्यातील श्रींची आरास केलेली मूर्ती.
--------------------
भाद्रपदी गणेशोत्सवाची
गणपतीपुळे येथे सांगता
रत्नागिरी, ता. ७ ः भाद्रपदी गणेशोत्सवानिमित्त गणपतीपुळे येथील मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या उत्सवाची सांगता बुधवारी (ता. ७) झाली. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही गणपतीपुळे येथील मंदिरात भाद्रपदी गणेशोत्सव अत्यंत उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. उत्सव समाप्ती महाप्रसा व वामन द्वादशीनिमित्त मंदिरात आकर्षक करण्यात आली होती.
भाद्रपदी गणेशोत्सव गणपतीपुळेच्या मंदिरात उत्साहात साजरा करण्यात आला. पहिल्या दिवशी पूजा करण्यात आली. त्यानंतर महाप्रसाद आणि सायंकाळी भजन असा कार्यक्रम सुरू झाला. या उत्सवाची सांगता झाली. दरदिवशी श्रींच्या मूर्तीसमोर फुलांनी आरास केली. भाद्रपद चतुर्थीला वर्षातील एक दिवस गाभाऱ्यात जाऊन गणरायाच्या चरणाशी स्पर्श करून दर्शन घेण्याची परंपरा असल्यामुळे त्या दिवशी दुपारपर्यंत हजारो भक्तांनी त्याचा लाभ घेतला. या कालावधीत परजिल्ह्यातील अनेक पर्यटक गणपतीपुळेत दाखल झाले होते. मंदिरातील गणपतीची आरास देवस्थानचे मुख्य पुजारी अभिजित घनवटकर व सहकाऱ्यांनी केली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94175 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..